टीम इंडियाचा स्टार अय्यर अडकला विवाहबंधनात; 'श्रुति'ला बनवले आयुष्याचा जोडीदार

Venkatesh Iyer Marriage Photos : व्यंकटेश अय्यर विवाहबंधनात अडकला आहे.

भारतीय संघाचा खेळाडू व्यंकटेश अय्यर विवाहबंधनात अडकला आहे. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या अय्यरने यंदाच्या आयपीएल हंगामात चांगली कामगिरी केली.

व्यंकटेश अय्यर आणि श्रुति रगुनाथन यांनी सातफेरे घेतले आहेत. त्याने 'श्रुति'ला आयुष्याचा जोडीदार बनवले.

व्यंकटेश अय्यरने नोव्हेंबर २०२१ मध्ये त्याने भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. अय्यरला आंतरराष्ट्रीय सामन्यांत फार कमाल करून दाखवता आली नाही.

माहितीनुसार, अय्यरची पत्नी श्रुति रगुनाथनने पीएसजी कॉलेज ऑफ आर्ट अँड सायन्समधून बीकॉम केले आहे आणि एनआयएफटी इंडियामधून फॅशन मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे.

व्यंकटेश अय्यरने भारतासाठी दोन वन डे आणि ९ ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. IPL मध्ये त्याने KKR साठी ३६ सामन्यांत २८ च्या सरासरीने ९५६ धावा केल्या आहेत.

व्यंकटेश अय्यरने आयपीएल २०२४ च्या अंतिम सामन्यात चमकदार कामगिरी केली. अय्यरच्या स्फोटक खेळीच्या जोरावर केकेआरने तिसऱ्यांदा किताब जिंकला.