Cricket Buzz»फोटो गॅलरी »कुठं हसू तर कुठं अश्रू! रिंकूनं मित्रालाच केलं व्हिलन; गुजरातनं ३.२० कोटी ओतलेला यश दयाल कोण आहे?कुठं हसू तर कुठं अश्रू! रिंकूनं मित्रालाच केलं व्हिलन; गुजरातनं ३.२० कोटी ओतलेला यश दयाल कोण आहे? By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 4:13 PMOpen in App1 / 10इंडियन प्रीमिअर लीगच्या १६व्या हंगामातील सर्वात रंगतदार सामना काल पार पडला. कोलकाता नाईट रायडर्सने अखेरच्या चेंडूवर गतविजेत्या गुजरात टायटन्सचा पराभव केला. अखेरच्या षटकात २९ धावांची गरज असताना केकेआरच्या रिंकू सिंगने कमाल केली. 2 / 10रिंकू सिंगने सलग पाच षटकार ठोकून गुजरातचा विजयरथ रोखला. खरं तर अखेरच्या षटकातील पहिल्या चेंडूवर उमेश यादवने एक धाव काढून रिंकूला फलंदाजी करण्याची संधी दिली. रिंकूने यश दयालच्या पुढच्या पाच चेंडूवर षटकार ठोकून विजय साकारला.3 / 10रिंकूने २१ चेंडूत ४८ धावांची नाबाद खेळी करून संघाला दुसरा विजय मिळवून दिला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेला हा सामना अविस्मरनीय ठरला आहे. रिंकू ५ षटकार ठोकून हिरो झाला पण गोलंदाज यश दयालला अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. 4 / 10या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ४ बाद २०४ केल्या होत्या. दरम्यान, गुजरातकडून साई सुदर्शन (५३) आणि विजय शंकरने २४ चेंडूत नाबाद ६३ धावांची खेळी केली. गुजरातने दिलेल्या २०५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरची खराब सुरूवात झाली. 5 / 10सलामीवीर दोघेही स्वस्तात माघारी परतले. पण व्यंकटेश अय्यरने ४० चेंडूत ८० धावा करून विजयाकडे कूच केली. अशातच अल्झारी जोसेफने व्यंकटेश अय्यर (८०) आणि कर्णधार नितीश राणाला (४५) बाद करून यजमान संघाच्या चाहत्यांना जागे केले. त्यानंतर टायटन्सचा कर्णधार राशिद खानने हॅटट्रिक घेऊन जवळपास विजय निश्चित केला होता.6 / 10अखेरच्या षटकांत केकेआरला विजयासाठी २९ धावांची गरज होती. रिंकू सिंगने स्फोटक खेळी करून सामन्याचा निकाल बदलला. यश दयालच्या गोलंदाजीवर सलग ५ षटकार ठोकून केकेआरने सलग दुसरा विजय नोंदवला. 7 / 10आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात गुजरात टायटन्सने युवा गोलंदाज यश दयालला ३ कोटी २० लाख रूपयांमध्ये खरेदी केले होते. आपल्या पहिल्या हंगामात त्याने ९ सामन्यांत ११ बळी घेऊन सर्वांना प्रभावित केले होते.8 / 10भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर असताना त्याला संघात देखील स्थान मिळाले होते. उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील यश दयालच्या नावावर आता एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. त्याचे वडील चंद्रपाल हे देखील वेगवान गोलंदाज होते.9 / 10दरम्यान, रिंकू सिंग आणि यश दयाल दोघेही डॉमेस्टिक क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशच्या संघाचे प्रतिनिधित्व करतात. दोघेही सहकारी आहेत. 10 / 10कालच्या सामन्यात रिंकूने ६ षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने २१ चेंडूत ४८ धावांची नाबाद खेळी केली. अखेर केकेआरने २० षटकांत ७ बाद २०७ धावा करून गुजरात टायटन्सचा विजयरथ रोखला. आणखी वाचा Subscribe to Notifications