Cricket Buzz»फोटो गॅलरी »World Record : ६,६,६,६,६,६,६,६,६,६,६,६; KXIPच्या फलंदाजाचा T10 लीगमध्ये षटकारांचा पाऊस, VideoWorld Record : ६,६,६,६,६,६,६,६,६,६,६,६; KXIPच्या फलंदाजाचा T10 लीगमध्ये षटकारांचा पाऊस, Video By स्वदेश घाणेकर | Published: February 01, 2021 9:39 AMOpen in App1 / 10इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) यूएईत झालेल्या १३व्या पर्वानंतर बरेच खेळाडू Abu Dhabi T10 League मध्ये अॅक्शनमध्ये दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्सचा माजी सलामीवीर एव्हान लुईस याच्या फटकेबाजीनंतर आणखी एका वेस्ट इंडिजच्या खेळाडूनं गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं.2 / 10रविवारी रात्री झालेल्या एका सामन्यात नॉर्दर्न वॉरियर्स ( Northern Warriors ) आणि बांगला टायगर्स ( Bangla Tigers ) यांच्यात दमदार खेळ पाहायला मिळाला. या सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंनी मिळून तब्बल ३० षटकार खेचले. यापैकी १२ षटकार एकाच खेळाडूनं टोलवले.3 / 10प्रथम फलंदाजी करताना वॉरियर्सनं १० षटकांत ४ बाद १६२ धावा चोपल्या, प्रत्युत्तरात टायगर्स संघाला ३ बाद १३२ धावाच करता आल्या. 4 / 10या सामन्यात वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी पुन्हा एकदा तुफान फटकेबाजी केली. वॉरियर्सचा सलामीवीर लेंडस सिमन्स आणि वसीम मुहम्मद यांनी चांगली सुरुवात केली. 5 / 10मुहम्मद ५ चेंडूंत २ षटकारासह १२ धावा करून माघारी परतला. त्यानंतर सिमन्स आणि निकोलस पूरन ( Nicholas Pooran) यांनी टायगर्सच्या गोलंदाजांची शेळी केली.6 / 10सिमन्स २२ चेंडूंत ३ चौकार व तितकेच षटकार खेचून ४१ धावांवर माघारी परतला. त्यानंतर किंग्स इलेव्हन पंजाबच्या ( KXIP) पूरननं टी १० लीगमध्ये विश्वविक्रमी खेळी केली. त्यानं २६ चेंडूंत ८९ धावा चोपल्या. 7 / 10निकोलस पूरनच्या ८९ धावांपैकी ८४ धावा या चौकार-षटकारांतून आल्या होत्या. त्यात १२ षटकार व ३ चौकारांचा समावेश होता. त्यानं ३४२.३१च्या स्ट्राईक रेटनं ही फटकेबाजी केली. 8 / 10निकोलस पूरननं टी १० लीगमध्ये आतापर्यंत ३ सामन्यांत ५४च्या सरासरीनं १६२ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट २८९.२९ असा असून त्यानं लीगमध्ये सर्वाधिक १८ षटकार व १० चौकार लगावले आहेत. 9 / 10या लीगमध्ये सर्वाधिक ६० षटकारांचा विक्रम निकोलस पूरनच्या नावावर नोंदवला गेला आहे. शिवाय एका सामन्यात सर्वाधिक १२ षटकारांचा विक्रमही त्यानं कालच्या सामन्यात नावावर केला. यात त्यानं एका षटकार ३२ धावा चोपल्या.10 / 10निकोलस पूरननं आयपीएल २०२०त पंजाबसाठी १४ सामन्यांत ३५३ धावा केल्या. त्यात दोन अर्धशतकांचा समावेश होतो. आयपीएल २०२०त त्यानं २३ चौकार व २५ षटकार खेचले. आणखी वाचा Subscribe to Notifications