Join us  

लॉरेन बेल : तिच्या स्माईलच्या बाऊन्सरने क्रिकेटचे चाहते घायाळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 10:49 AM

Open in App
1 / 10

इंग्लंड महिला क्रिकेट संघात (England Women's Cricket Team) एका सुंदर क्रिकेटपटूचा समावेश करण्यात आला आहे, तिची सध्या खूप चर्चा होत आहे. लॉरेन बेल (Lauren Bell)असे या सुंदर खेळाडूचे नाव आहे.

2 / 10

लॉरेन बेलचे पूर्ण नाव लॉरेन केटी बेल (Lauren Katie Bell) आहे, तिचा जन्म 2 जानेवारी 2001 रोजी विल्टशायर (Wiltshire) काउंटीच्या स्विंटन (Swindon) शहरात झाला.

3 / 10

21 वर्षीय लॉरेन बेल (Lauren Bell) ही एक उत्कृष्ट वेगवान गोलंदाज म्हणून ओळखली जाते, ती बाउन्सर गोलंदाजीत सुद्धा माहीर आहे. तिची उंची जवळपास 6 फूट आहे, म्हणूनच तिला तिच्या जवळचे 'द शार्ड' (The Shard) म्हणतात.

4 / 10

इंग्लंडच्या महिलांच्या देशांतर्गत क्रिकेटबद्दल बोलायचे झाल्यास, बर्कशायर (Berkshire), मिडलसेक्स (Middlesex), सदर्न वायपर्स (Southern Vipers) आणि सदर्न ब्रेव्ह (Southern Brave) या संघांसाठी लॉरेन बेल (Lauren Bell) खेळली आहे.

5 / 10

लॉरेन बेलचा (Lauren Bell) अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) महिला ऍशेस (Women’s Ashes) मालिकेसाठी इंग्लंडच्या 18 सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे. ती लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करेल, अशी अपेक्षा आहे.

6 / 10

लॉरेन बेलचे (Lauren Bell) अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण झालेले नाही. तिने गेल्या उन्हाळ्यात महिलांच्या संघात सदर्न ब्रेव्हजसाठी 12 विकेट्स घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

7 / 10

इंग्लंडच्या सीनियर महिला संघाविरुद्धच्या सराव सामन्यात, लॉरेन बेलने (Lauren Bell) अप्रतिम गोलंदाजीची कामगिरी केली होती. टॅमी ब्युमॉंट, नॅट सायव्हर आणि एमी जोन्स यांना बाद करत फक्त 35 धावा दिल्या होत्या. यानंतर, तिने अॅडलेडमध्ये ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या पहिल्या अनौपचारिक टी-20 सामन्यात 17 धावांत 3 बळी घेतले होते.

8 / 10

गेल्या काही सामन्यांत लॉरेन बेलने (Lauren Bell) खरोखरच चांगली गोलंदाजी केली आहे. तिने आम्हाला कसोटी निवडीसाठी विचार करण्याचा दुसरा पर्याय दिला आहे,' असे मुख्य प्रशिक्षक लिसा केइटली यांनी सांगितले आहे.

9 / 10

लॉरेन बेल (Lauren Bell) दिसायला खूप सुंदर आहे आणि तिचे स्मित हास्य सर्वांना घायाळ करणारे आहे. त्यामुळेच तिने क्रिकेट फॅन्सला वेड लावले आहे. दरम्यान, इंग्लंड संघात तिची निवड झाल्यानंतर तिचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

10 / 10

टॅग्स :इंग्लंडटी-20 क्रिकेट
Open in App