Cricket Buzz»फोटो गॅलरी »विराट कोहलीकडून 'या' पाच गोष्टी शिकाच...विराट कोहलीकडून 'या' पाच गोष्टी शिकाच... By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 3:54 PMOpen in App1 / 6भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने बुधवारी वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या वन डे सामन्यात दहा हजार धावांचा टप्पा ओलांडला. त्याने 205 डावांत हा टप्पा ओलांडून सर्वात जलद दहा हजार धावांचा विक्रम केला. त्याने महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( 259) याचा विक्रम मोडला. त्याचा इथवरचा प्रवास हा सोपा नक्कीच नव्हता. 2 / 6विराटने एक यशस्वी क्रिकेटपटू होण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. फिटनेस असो किंवा खेळात सुधारणा, विराटने प्रत्येक गोष्टीसाठी कठोर परिश्रम घेतले आहेत.3 / 6विराट शिस्तप्रीय आहे. फिटनेसची तो अधिक काळजी घेतो. त्याने बऱ्याच वर्षांपूर्वी जंक फूड खाणे सोडले. 4 / 6विराट तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळतो. त्यामुळे तो सतत व्यग्र असतो. त्याशिवाय काही व्यवसायिक कमिटमेंटही त्याला पाळाव्या लागतात. व्यग्र वेळापत्रकातही तो व्यायामासाठी वेळ काढतो. 5 / 6तो प्रत्येक वेळी स्वतःला झोकून देत खेळतो. फलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण तो मैदानावर शंभर टक्के योगदान देण्यासाठी तयार असतो. 6 / 6विराट मैदानावर उतरतो त्यावेळी त्याच्यावर कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षांचे ओझे असते. याचे दबाव न घेता तो त्या अपेक्षांना प्रेरणा मानून खेळ करतो. त्यामुळेच त्याचा खेळ अधिक उंचावतो. आणखी वाचा Subscribe to Notifications