Cricket Buzz»फोटो गॅलरी »भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकले पाकिस्तानी क्रिकेटपटू!भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकले पाकिस्तानी क्रिकेटपटू! By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 2:38 PMOpen in App1 / 8सलीम मलिक ( 2000 ) - मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली आजीवन बंदीची शिक्षा झालेला पहिला क्रिकेटपटू... त्याला त्यासाठी कारावासाची शिक्षाही झाली. 2008मध्ये न्यायालयानं त्याच्यावरील आजीवन बंदी उठवली.2 / 8अता-उर-रेहमान ( 2000) - भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली रेहमानवर निलंबनाची कारवाई झाली होती. फिक्सरसोबत संपर्कात असल्याचा आरोप त्याच्यावर होता. 2006मध्ये त्याच्यावरील बंदी उठली.3 / 8मोहम्मद आमीर ( 2011) - स्पॉट फिक्सिंग प्रकरणात मोहम्मद आमीर दोषी आढळला. त्यानं सामन्यात जाणीवपूर्वक नो बॉल टाकले. त्याच्यावर 5 वर्षांच्या निलंबनाची कारवाई झाली.4 / 8मोहम्मद आसीफ ( 2011) - इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात आसीफने जाणीवपूर्वक नो बॉल टाकले होते आणि त्याला 12 महिन्यांचा कारावासाची शिक्षा झाली होती. त्यानंतर त्याच्यावर 7 वर्षांची बंदी घालण्यात आली.5 / 8सलमान बट ( 2011) - इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भ्रष्टाचार करणारा आणखी एक पाकिस्तानी खेळाडू. त्याला अडीच वर्षांचा कारावास आणि 10 वर्षांच्या बंदीची शिक्षा झाली6 / 8दानिश कानेरिया ( 2010) - फिरकीपटूवर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळानं आजीवन बंदी घातली. 2018मध्ये त्यानं फिक्सिंग केल्याचे कबुल केले. 7 / 8शर्जील खान ( 2017) - पाकिस्तान सुपर लीगमध्ये स्पॉट फिक्सिंग करणारा पहिला पाकिस्तानी खेळाडू. त्याच्यावर पाच वर्षांची बंदी घातली गेली.8 / 8 उमर अकमल ( 2020) - पीसीबीनं फेब्रुवारी महिन्यात अकमलवर निलंबनाची कारवाई केली होती. फिक्सिंग संदर्भातील माहिती पीसीबीपासून लपवल्याचा त्याच्यावर आरोप होता. याच प्रकरणात तो दोषी आढळला असून त्याला तीन वर्ष सर्व क्रिकेट स्पर्धांपासून दूर रहावे लागणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications