सचिन तेंडुलकरने पंतप्रधान सहाय्यता निधी आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीत प्रत्येकी 25 लाखांची मदत केली आहे.
विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी मिळून पंतप्रधान व महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीत हातभार लावला आहे. त्यांनी नेमकी किती मदत केली हे जाहीर केलं नाही, परंतु सूत्रांच्या माहितीनुसार ही मदत 3 कोटींची आहे.
ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूनं आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्याच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीत प्रत्येकी 5 लाख दिले आहेत.
भारताचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनानं 52 लाखांची मदत केली आहे. यापैकी 31 लाख हे पंतप्रधान सहाय्यता निधीत, तर 21 लाख उत्तर प्रदेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जाणार आहेत.
टीम इंडियाचा कसोटी संघाचा उप कर्णधार अजिंक्य रहाणेनं मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 10 लाखांची मदत केली आहे.
सुपर मॉम बॉक्सर मेरी कोमनं तिचा एका महिन्याचा पगार आणि खासदार फंडातून 1 कोटींची मदत केली आहे.
भारताचा माजी सलामीवीर आणि खासदार गौतम गंभीरनं त्याच्या फंडातून 1 कोटींची मदत दिल्ली सरकारला केली आहे.
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं 50 लाख रुपयांचे तांदुळ गरजूंना दान केले आहेत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) त्यांच्या संलग्न संघटनांसह मिळून 51 कोटींची मदत केली.
मुंबई क्रिकेट असोसिएशननं राज्य सरकारला 50 लाखांची मदत केली. शिवाय बीसीसीआयच्या फंडातही 50 लाख दिले.
भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियानं त्याचा सहा महिन्याचा पगार दिला आहे.
16 वर्षीय भारतीय महिला क्रिकेटपटू रिचा घोषऩं 1 लाखांची मदत केली.
इरफान व युसुफ पठाणनं 4000 मास्क दिले.
भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजनं 10 लाखांची मदत केली
भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झानं उभ्या केलेल्या चळवळीतून 1.25 कोटी जमा झाले आहेत.
गोल्डन गर्ल हिमा दासनं तिचा एका महिन्याचा पगार दिला आहे.
रोहित शर्मानं पंतप्रधान सहाय्यता निधीत 45 लाखांची मदत केली. शिवाय त्यानं महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 25 लाख रुपये दिले. याशिवाय Zomato Feeding India आणि भटक्या कुत्र्यांसाठी कार्य करणाऱ्या WelfareOfStrayDogs. संस्थेला प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर केली. रोहितनं एकूण 80 लाखांची मदत केली.