PHOTOS : बिझनेसवुमनला बनवलं जोडीदार; गंभीरची पत्नी जणू काही अभिनेत्रीच; पाहा सौंदर्य नताशाचे

Gautam Gambhir Love Story : गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनला आहे.

भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनला आहे. राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपल्याने गंभीरवर ही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

येत्या २७ तारखेपासून भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर ट्वेंटी-२० मालिका खेळेल. या मालिकेपासून गंभीर प्रशिक्षकपदाचा कारभार सांभाळेल. क्रिकेटपटू, राजकारणी, मेंटॉर आणि आता मुख्य प्रशिक्षक म्हणून गंभीर कार्यरत आहे.

गौतम गंभीर महागड्या गाड्यांचा मालक आहे. त्याच्याकडे मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, ऑडी आणि टोयोटा कोरोलासारख्या महागड्या कार आहेत. गौतम गंभीरची कमाई केवळ आयपीएल आणि राजकारणातूनच नाही तर ब्रँड प्रमोशनमधूनही होते.

गौतम गंभीरची प्रेमकहाणी खूपच फिल्मी आहे. त्याने आपल्या वडिलांच्या मित्राच्या मुलीशी लग्न केले. गंभीरने लग्नासाठी खास अट ठेवली होती.

२०११ च्या वन डे विश्वचषकानंतरच लग्न करणार असल्याचे गंभीरने नताशाला सांगितले होते. त्यानंतरच गंभीर आणि नताशा यांनी सातफेरे घेतले.

गौतम गंभीरची पत्नी नताशा जैन एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. ती तिच्या अप्रतिम सौंदर्याने क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधते.

गंभीरला चीअर करण्यासाठी अनेकदा नताशाने स्टेडियमच्या प्रेक्षक गॅलरीत हजेरी लावली आहे. आयपीएल २०२४ मध्ये गंभीरने केकेआरच्या संघाला मार्गदर्शन करताना किताब जिंकवून दिला.

गंभीरने २०११ मध्ये नताशा जैनसोबत लग्न केले. जी एका व्यापारी कुटुंबातून येते. नताशा राजघराण्यातील आहे. ती स्वतः एक व्यावसायिक महिला देखील आहे. लग्नापूर्वी ते खूप चांगले मित्र होते.

गंभीर आणि नताशा हे दोन मुलांचे पालक आहेत. दोघांना दोन मुली आहेत. त्यांच्या मोठ्या मुलीचे नाव आजीन आणि लहान मुलीचे नाव अनैजा आहे.