Join us  

IPL 2022 : लखनौ फ्रँचायझीनं कंबर कसली, लोकेश राहुलला कर्णधार बनवण्याची तयारी दर्शवली; राशीद खानला 'लॉटरी', हार्दिक किंवा इशान यांना देणार संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 12:33 PM

Open in App
1 / 6

Indian Premier League मध्ये नव्यानं दाखल झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं मुख्य प्रशिक्षक म्हणून अँडी फ्लॉवर आणि मेंटॉर म्हणून भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याची नियुक्ती जाहीर केली आहे.

2 / 6

आता लखनौ फ्रँचायझीनं IPL 2022साठी त्यांचा मोर्चा खेळाडूंकडे वळवला आहे. लखनौ फ्रँचायझीनं लोकेश राहुलला ( KL Rahul) कर्णधार बनवण्याची तयारी दर्शवली आहे. पंजाब किंग्सकडून खेळण्यास लोकेश राहुलनं नकार दिल्यानंतर तो RCB सोबत जाईल अशी चर्चा रंगली होती, परंतु लखनौ फ्रँचायझी सध्या राहुलसाठी आघाडीवर आहेत.

3 / 6

भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यानं लखनौ फ्रँचायझी राशिद खानला ( Rashid Khan) ताफ्यात घेऊ शकतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिदनं आयपीएलमध्ये ७६ सामन्यांत ९३ विकेट्स घेतल्या आहेत. सनरायझर्स हैदराबादसोबत पैशांच्या वादावरून राशिद खाननं नातं तोडल्याची चर्चा आहे. पण, आता लखनौ फ्रँचायझी त्याच्यासाठी १६ कोटींपर्यंत रक्कम मोजण्याच्या तयारीत आहेत.

4 / 6

हार्दिक पांड्या सध्या भारतीय संघातून बाहेर आहे आणि तंदुरुस्ती सिद्ध केल्याशिवाय त्याला संघात एन्ट्री मिळणे अवघड आहे. त्यात मुंबई इंडियन्सनंही त्याला रिलिज केलं. अशात तो अहमदाबाद किंवा लखनौ फ्रँचायझीकडून खेळताना दिसू शकतो. आकाश चोप्राच्या मते लखनौ फ्रँचायझी हार्दिक किंवा इशान किशन यांच्यापैकी एकाची निवड करू शकतात.

5 / 6

इशान किशननं मागील दोन पर्वांत मुंबई इंडियन्सकडून दमदार कामगिरी केली आहे. या यष्टिरक्षकानं भारताच्या ट्वेंटी-२० संघातही स्थान पटकावलं आहे. अशात लखनौ फ्रँचायझी लोकेश राहुलसोबत सलामीली इशान किशनचा विचार करू शकते.

6 / 6

परदेशी खेळाडूंमध्ये लखनौ फ्रँचायझी बेन स्टोक्स, कागिसो रबाडा किंवा स्टीव्ह स्मिथ यांच्यापैकी एकावर दावा सांगू शकते. याशिवाय भारतीय खेळाडूंमध्ये मोहम्मद शमी, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल हे त्यांच्या रडारवर असतील.

टॅग्स :आयपीएल २०२१लोकेश राहुलहार्दिक पांड्याइशान किशनलखनऊ
Open in App