इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात वेस्ट इंडिजचा स्टार अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डर लखनौ सुपर जायंट्सकडून खेळताना दिसतोय.
मागील पर्वात सनरायझर्स हैदराबाद संघाकडून तो खेळला होता, परंतु आयपीएल २०२२ मेगा ऑक्शनपूर्वी त्याला रिलिज केले.
लखनौ सुपर जायंट्सने ८.७५ कोटी रुपये मोजून त्याला करारबद्ध केले. २७ वर्षीय होल्डरने आतापर्यंत आयपीएलमध्ये १८९ धावा आणि ३५ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स याही संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने ५६ कसोटी सामन्यांत २५७१ धावा केल्यात व १४२ विकेट्स घेतल्या आहेत. १२७ वन डे सामन्यांत त्याच्या नावावर २०१९ धावा व १४६ विकेट्स आहेत.
६.७ फुट उंच असलेल्या या खेळाडूची लाईफस्टाईल खूप भारी आहे. तो मानसशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या जास्मिन क्विन (Jasmine Quinn) हिच्या प्रेमात पडला आहे.
जेसन होल्डर व जास्मिन क्विन हो सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. या दोघांनी एकमेकांसोबतचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत.
जास्मिन ही मानसशास्त्राच्या अभ्यास करत आहे. मागील ६-७ वर्षांपासून ही दोघं रिलेशनशीप मध्ये आहेत आणि २०१६मध्ये जेसन होल्डरने जास्मिनसोबतचा फोटो पोस्ट करून त्यांचे प्रेम जगजाहीर केले होते.