Join us

इकडे वर्ल्डकप फायनलचा थरार; तिकडे MS धोनी नैनीतालमध्ये काय करतोय? फोटो व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2023 16:54 IST

Open in App
1 / 7

Mahendra Singh Dhoni In Nainital: क्रिकेटप्रेमींसाठी आजचा दिवस खूप खास आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया, यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनल सामना होत आहे.

2 / 7

जगभरातील चाहते हा सामना पाहत असताना, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी मात्र आपल्या कुटुंबासह नैनितालमध्ये सुट्टी घालवत आहे.

3 / 7

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषकातील ऐतिहासिक अंतिम सामना खेळवला जात आहे. पण, धोनीची पत्नी साक्षी हिचा आज(दि.19) वाढदिवस आहे.

4 / 7

पत्नीच्या वाढदिवसामुळे धोनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह नैनीतालमध्ये सुट्टीचा आनंद लुटत आहे. धोनीच्या नैनीताल हॉलिडेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

5 / 7

वाढदिवसानिमित्त साक्षीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नैनीतालच्या प्रसाद भवनाबाहेरील लॉनमध्ये मुलगी जीवासोबत मस्ती करतानाचा फोटो शेअर केला आहे.

6 / 7

या फोटोला काही मिनिटांतच एक लाखाहून अधिक युजर्सनी लाईक केले आणि सहाशेहून अधिक लोकांनी कमेंट केल्या. यावेळी काही चाहत्यांनी धोनीचा फोटो अपलोड करण्याची विनंती केली.

7 / 7

साक्षीने जीवासोबत नैनी तलावात नौकानयन करतानाचा व्हिडिओही पोस्ट केला, त्याला काही मिनिटांतच एक लाखाहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आणि चारशेहून अधिक कमेंट्स केल्या. यासोबतच तिने बर्ड डे वीकचा उल्लेखही केला आणि इथेच तिचा वाढदिवस साजरा होणार असल्याचे संकेतही दिले.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीनैनीताल-उधमसिंह नगरऑफ द फिल्डवन डे वर्ल्ड कप