टीम इंडियातील स्टार खेळाडूच्या बहिणीचं नदीकिनारी फोटोसेशन, लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

Malti Chahar Photos: टीम इंडियातील वेगवान गोलंदाज दीपक चहर हा नेहमीच चर्चेत असतो. दीपकची बहीण मालती चहर हीसुद्धा सोशल मीडियावर चर्चेत असते. ती लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. दरम्यान, तिने सोशल मीडियावर आपले काही फोटो शेअर केले आहेत, फॅन्समध्ये या फोटोंची एकच चर्चा सुरू असून, फॅन्सकडून या फोटोंचं कौतुक होत आहे.

टीम इंडियातील वेगवान गोलंदाज दीपक चहर हा नेहमीच चर्चेत असतो. दीपकची बहीण मालती चहर हीसुद्धा सोशल मीडियावर चर्चेत असते. ती लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. दरम्यान, तिने सोशल मीडियावर आपले काही फोटो शेअर केले आहेत, फॅन्समध्ये या फोटोंची एकच चर्चा सुरू असून, फॅन्सकडून या फोटोंचं कौतुक होत आहे.

दीपक चहरची बहीण मालती चहर ही पेशाने एक सुपर मॉडेल आहे. तिने हल्लीच नदीकिनारी फोटोशूट केलं होतं. हे फोटो आता तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंवर फॅन्सकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

मालती चहरच्या फिल्मी करिअरची सुरुवात इश्क पश्मिना या चित्रपटामधून होत आहे. हा चित्रपट २३ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात मालती भाविन भानुशालीसोबत दिसणार आहे.

मालती चहरला सोशल मीडियावर खूपजण फॉलो करतात. तसेच ती खूप प्रसिद्धही आहे. ती सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. तसेच ती काही हॉट फोटोही शेअर करत असते. सध्या तिचे इन्स्टाग्रामवर १ दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत.

मालती चहर ही मिस इंडिया -२०१४ ची फायनलिस्ट राहिलेली आहे. त्याचवर्षी तिने मिस नॉर्दन रिजनच्या मिस इंडिया स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले होते.

दीपक चहरने सर्वांसमोर आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केल्यानंतर मालतीनेही सोशल मीडियावरून त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. मालती तिच्या भावासोबत फोटो शेअर करत असते.