मयांक अग्रवालची बायको वकील अन् सासरे CBI संचालक; भन्नाट आहे लव्ह स्टोरी

भारतीय संघाचा फलंदाज मयांक अग्रवाल ( Mayank Agarwal ) याची प्रकृती आता सुधारली आहे आणि त्याने स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे.

भारतीय संघाचा फलंदाज मयांक अग्रवाल ( Mayank Agarwal ) याची प्रकृती आता सुधारली आहे आणि त्याने स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. कर्नाटक रणजी संघाचा कर्णधार अग्रवाल याला काल विमानात विषबाधा झाली होती. फ्लाइटमध्ये पाणी प्यायल्याने अग्रवाल आजारी पडला आणि त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्रिपुरातील आगरतळा येथून सुरतला जात असताना ही घटना घडली. मयांकने सीटसमोर ठेवलेले पाणी प्यायले. पाणी प्यायल्याबरोबर त्याची जीभ, तोंड आणि गाल भाजल्यासारखे झाले. मयांकला बोलता येत नव्हते. त्याला तातडीने आगरतळा येथील आयएलएस रुग्णालयात हलवण्यात आले होते. आता तो बरा आहे.

मयंक अग्रवाल यांचा जन्म १६ फेब्रुवारी १९९१ रोजी बंगळुरू येथे झाला. त्याचे आजोबा रवींद्र अग्रवाल यांचे धाकटे भाऊ सुशील अग्रवाल हे सहारनपूर येथील इंडियन हर्ब्स कंपनीचे मालक आहेत. रवींद्र अग्रवाल १९९६ पर्यंत सहारनपूरमध्ये राहत होते आणि व्यवसाय करत होते. यानंतर ते बंगळुरूला शिफ्ट झाला.

मयांक अग्रवाल बंगळुरूमधील बिशप कॉटन बॉईज स्कूलमध्ये शिकत असताना त्याने १३ वर्षांखालील संघात स्थान मिळवले. वयाच्या १५ व्या वर्षी मॉडर्न क्रिकेट क्लबने मयंकची लीग सामन्यासाठी निवड केली.

मयांक अग्रवालचे वैयक्तिक आयुष्य फार इंटरस्टींग आहे. त्याने २०१८ मध्ये वकील अशिता सूद हिच्याशी लग्न केले. दोघेही शालेय जीवनापासूनचे मित्र आहेत आणि ७ वर्ष डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले. दोघांना एक मुलगाही आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच मयांक पिता झाला.

मयांक अग्रवालचे सासरे प्रवीण सूद हे आयपीएस अधिकारी आहेत. प्रवीण सूद हे CBI चे नवे संचालक बनले आहेत आणि ते दोन वर्षांसाठी सीबीआयचे संचालक असतील. याआधी ते कर्नाटकचे डीजीपी राहिले आहेत

मयांकने आशिताला खास पद्धतीने प्रपोज केले. लंडनमधील थेम्स नदीच्या काठावर बांधलेल्या लंडन आयवर त्यांनी आशितासमोर प्रेम व्यक्त केले होते. मयांकच्या प्रपोजलवर आशिताचा विश्वास बसेना.