सध्याच्या घडीला मयंती लँगर टेलिव्हिजनवरील फुटबॉल आणि क्रिकेटविषयक कार्यक्रमांमधील ग्लॅमरस चेहरा म्हणून ओळखली जाते.
मयंती लँगर ही लेफ्टनंट जनरल संजीव लँगर यांची मुलगी आहे. तिने दिल्लीच्या हिंदू महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले.
टेलिव्हिजनवरील क्रीडाविषक चर्चांमध्ये सूत्रसंचालक म्हणून तिने अल्पावधीतच प्रसिद्धी मिळवली.
मयंती महाविद्यालयात असताना फुटबॉल खेळत असे. यामधूनच तिची खेळाविषयीची आवड वाढली.
मयंतीचा ग्लॅमरस अंदाज नेहमीच क्रीडारसिकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.
स्टुअर्ट बिन्नी आणि मयंती लँगर हे दोघेजण २०१२ मध्ये विवाहबद्ध झाले.
मयंती लँगर हिने यापूर्वी झी स्पोर्टसवरील फुटबॉल कॅफे आणि स्टार स्पोर्टसवरील अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे.
मयंतीला जाहिरात किंवा ग्राफिक डिझायनिंग क्षेत्रात करियर करायचे होते. मयंती म्हणते की, ती खूप कमी बोलते आणि करिअरकडे जास्त लक्ष देते.