Cricket Buzz»फोटो गॅलरी »New Laws Of Cricket: क्रिकेटच्या नियमात मोठा बदल, फलंदाजानं 'असं' केलं तर बाद होणार!New Laws Of Cricket: क्रिकेटच्या नियमात मोठा बदल, फलंदाजानं 'असं' केलं तर बाद होणार! By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2022 10:02 AMOpen in App1 / 9क्रिकेट खेळ काळानुसार बदलत आला आहे. तसंच खेळाला अधिक रोमांचक बनविण्यासाठी वेळोवेळी अनेक नियमांमध्येही आयसीसीकडून बदल करण्यात आले आहेत. क्रिकेटचे नियम तयार करण्याची जबाबदारी मेलबर्न क्रिकेट क्लबकडे (MCC) असते. या क्लबनं बुधवारी क्रिकेटच्या नियमांत काही महत्वाचे बदल केले आहेत. 2 / 9एमसीसीनं केलेल्या नव्या नियमांमुळे क्रिकेट आणखी रोमांचक होणार आहे. कारण ज्या मंकडिंग पद्धतीची क्रिकेटच्या मैदानात जोरदार चर्चा झाली आणि यात भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याचं नाव समोर आलं होतं. आता याच संदर्भातील नियमात बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे मंकडिंगमुळे होणारे वाद आता मैदानात होणार नाहीत. 3 / 9एमसीसीनं मंकडिंगबाबतच्या नियमात मोठा बदल केला आहे. मंकडिंग पद्धत नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिली आहे. पण ही पद्धत एक क्रिकेटचा भागच असल्यानं यापुढेही असे प्रकार होत राहणार यात शंका नाही. याआधी एखाद्या गोलंदाजानं फलंदाजाला मंकडिंग पद्धतीनं बाद केलं तर असं करणं खेळभावनेच्या विरोधात असल्याचं ठरवलं जात होतं. 4 / 9नॉन स्ट्राइकवर असलेला फलंदाज गोलंदाजानं चेंडू टाकण्याआधी क्रिज सोडलं आणि गोलंदाजानं हुशारीनं त्याला धावचीत केलं तर ते खेळभावनेच्या विरोधात असल्याचं आजवर ठरवलं जात होतं. यात गोलंदाजाला अनेक टीकांना देखील सामोरं जावं लागत होतं. पण आता नव्या नियमानुसार मंकडिंग पद्धतीला रनआऊटच्या नियमाअंतर्गत ग्राह्य धरलं जाणार आहे. 5 / 9'अनफेअर प्ले'च्या नियमात मोठा बदल करत 'नियम क्रमांक ३८' हा नवा कायदा अस्तित्वात आला आहे. यानुसार एखाद्या गोलंदाजानं नॉन स्ट्राइकवर असलेल्या फलंदाजाला मंकडिंग पद्धतीनं बाद केलं तर ते अवैध मानण्यात येणार नाही. 6 / 9मंकडिंगचा नियम मेलबर्न क्रिकेट क्लबद्वारे तयार करण्यात आला आहे. यात नॉन स्ट्राइकवर असलेल्या फलंदाजानं जर गोलंदाजानं चेंडू टाकण्याआधीच क्रिज सोडलं तर गोलंदाजाला संबंधित फलंदाजाला मंकडिंग पद्धतीन बाद करता येणार आहे. जर गोलंदाज मंकडिंग पद्धतीनं फलंदाजाला बाद करण्यात अपयशी ठरला तर पंच चेंडू 'डेड बॉल' म्हणून घोषीत करतील, असं नव्या नियमात नमूद करण्यात आलं आहे. 7 / 9मंकडिंगच्या नियमानुसारच एमसीसीकडून आणखी एक मोठा नियम अंमलात आणण्यात येणार आहे. कोरोनामुळे खेळाडूंना चेंडूला चकाकी आणण्यासाठी थुंकी किंवा लाळेचा वापर करण्यावर अनिश्चित काळापर्यंत बंदी घालण्यात आली होती. पण यासाठी कायमस्वरुपी नियम करण्यात आला आहे. यापुढे क्रिकेटमध्ये खेळाडूंना चेंडूला चकाकी आणण्यासाठी थुंकी किंवा लाळेचा वापर करता येणार नाही. केवळ घामाचा वापर करता येणार आहे. 8 / 9एमसीसीनं आणखी एक मोठा बदल केला आहे. एखादा फलंदाज झेलबाद झाला आणि त्यावेळी नॉन स्ट्राइकवर असलेल्या फलंदाजानं क्रिज क्रॉस केलं तर येणारा नवा फलंदाज याआधी नॉन स्ट्राइकवर जात असे. पण आता नव्या नियमानुसार एखादा फलंदाज झेलबाद झाला तर मैदानात येणाऱ्या नव्या फलंदाजालाच स्ट्राइक घ्यावी लागणार आहे. फक्त षटक संपल्याचा अपवाद वगळता मैदानात येणारा नवा फलंदाजच चेंडूला सामोरं जाणार आहे. 9 / 9लाइव्ह सामन्यावेळी व्यक्तीचा, प्राण्यांचा, पक्ष्यांचा किंवा इतर कोणत्याही वस्तूंमुळे व्यत्यय आल्यास संबंधित चेंडू पंचांकडून डेड बॉल घोषीत करण्यात येणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications