Cricket Buzz»फोटो गॅलरी »भारतीय 'सुंदरी' पडली दक्षिण आफ्रिकन क्रिकेटपटूच्या प्रेमात; 'सासू'बाईंना पटवण्यासाठी नाच नाच नाचली...भारतीय 'सुंदरी' पडली दक्षिण आफ्रिकन क्रिकेटपटूच्या प्रेमात; 'सासू'बाईंना पटवण्यासाठी नाच नाच नाचली... By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2023 5:20 PMOpen in App1 / 10दक्षिण आफ्रिकेच्या अष्टपैलू खेळाडूने भारतीय वंशाच्या मुलीला आपला जीवनसाथी बनवले आहे. दोघांची प्रेमकहाणी खूपच रंजक आहे कारण वेगवेगळ्या कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे त्यांना या लग्नासाठी त्यांच्या कुटुंबियांना राजी करावे लागले. दक्षिण आफ्रिकेच्या या क्रिकेटपटूने आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त मैत्रिणीसोबत भारतीय शास्त्रीय नृत्य सादर केले. दोघांचा डान्स पाहून आईने त्यांच्या नात्याला होकार दिला.2 / 10दक्षिण आफ्रिकेच्या एका क्रिकेटपटूने गेल्या वर्षी भारतीय वंशाच्या अतिशय सुंदर मुलीशी लग्न केले. ते २०२० मध्ये लग्न करणार होते, पण कोविड-१९मुळे ते होऊ शकले नाही. मात्र, एप्रिल २०२२ मध्ये या दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटरने भारतीय रितीरिवाजानुसार लग्न केले.3 / 10दक्षिण आफ्रिकेच्या या खेळाडूचे नाव केशव महाराज आहे आणि तो हनुमानाचा भक्त आहेत. केशव महाराजने २०२२ मध्ये भारतीय वंशाच्या लरीशा मुनसामीशी लग्न केले. केशव आणि लरीशा यांची पहिली भेट एका मित्राच्या माध्यमातून झाली होती. हळूहळू दोघांची मैत्री झाली आणि नंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. 4 / 10केशव महाराज आणि लरीशा मुनसामी यांना त्यांच्या प्रेमाचे लग्नात रुपांतर करायचे होते, तेव्हा त्यांच्यासमोर घरच्यांना मनवण्याचे कठीण काम होते. केशव महाराजांना त्यांच्या कुटुंबियांना पटवणे खूप अवघड होते, कारण लरीशा आणि त्यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी पूर्णपणे वेगळी होती.5 / 10अशा परिस्थितीत केशव महाराजाने हार न मानता एक योजना आखली. केशव महाराजांच्या आईचा ५० वा वाढदिवस होता. यावेळी त्यांनी नृत्याचा कार्यक्रम ठेवला. लरीशा मुनसामी ही कथक नृत्यांगना आहे, म्हणून केशवने लरीशासोबत त्याच्या आईसाठी कथ्थक नृत्य केले. केशव आणि लरीशाची केमिस्ट्री पाहून क्रिकेटरच्या आईला त्यांच्या प्रेम समजले आणि त्यांनी या जोडप्याच्या नात्याला होकार दिला. 6 / 10लरीशाला भेटून केशव महाराजच्या आईला खूप आनंद झाला, कारण लरीशा भारतीय संस्कृतीशी पूर्णपणे जोडलेली होती. भारतीय संस्कृती आणि चालीरीतींचा आदर कसा करायचा हे तिला माहीत होतं. 7 / 10केशव महाराज आणि लरीशा मुनसामी यांनी भारतीय रितीरिवाजांसह सात फेरे घेतले आहेत. लरीशाच नाही तर दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू केशव महाराज यांचीही मुळे भारताशी जोडलेली आहेत. केशव महाराजांचे पूर्वज भारतातील उत्तर प्रदेशातील सुलतानपूरचे आहेत.8 / 10एका मुलाखतीदरम्यान केशवचे वडील आत्मानंद यांनी त्यांना सांगितले की, त्यांचे पूर्वज 1874 च्या सुमारास सुलतानपूरहून डर्बनला आले होते, कारण त्यावेळी भारतातील लोक कामाच्या शोधात दक्षिण आफ्रिकेसारख्या देशांमध्ये जात असत. 9 / 10केशव महाराज यांच्या पत्नी लरीशा मुनसामी दक्षिण आफ्रिकेत खूप लोकप्रिय आहेत. त्याने आपल्या नृत्याने एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. बॉलीवूड गाण्यांची चाहती असण्यासोबतच लारीशा प्राणीप्रेमी देखील आहे. 10 / 10लरीशा खूप सुंदर आहे आणि तिचे इंस्टाग्रामवर खूप चाहते आहेत. इंस्टाग्रामवर लारीशाचे ४३.६ हजार फॉलोअर्स आहेत. ती तिचे सुंदर फोटो तसेच तिच्या डान्सचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते. आणखी वाचा Subscribe to Notifications