Join us  

सफा बेग अन् इरफान पठाणचा जुना फोटो व्हायरल; जाणून घ्या कोण आहे ही सुंदरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 10:46 AM

Open in App
1 / 13

इरफान पठाणचं नाव भारतीय संघातील यशस्वी अष्टपैलू खेळाडूंमध्ये आजही घेतलं जातं.

2 / 13

टीम इंडियात त्यानं गोलंदाज म्हणून एन्ट्री केली खरी, परंतु त्यानं अष्टपैलू म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. डिसेंबर 2003मध्ये त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

3 / 13

वयाच्या 19व्या त्यानं टीम इंडियात पदार्पण केले. 2001-02मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यानं दमदार कामगिरी करून निवड समितीचे लक्ष वेधले.

4 / 13

ऑस्ट्रेलियाविरुद्ध एडलेड कसोटीत तो पहिल्यांदा भारताकडून खेळला आणि तो सामना जिंकून भारतानं ऑस्ट्रेलियात 23 वर्षानंतर विजयाचा दुष्काळ संपवला. याच दौऱ्यावर त्यानं वन डे संघातही पदार्पण केले.

5 / 13

2006मध्ये पाकिस्तानविरुद्ध इरफानने जबरदस्त कामगिरी केली होती. त्यानं पहिल्याच षटकात हॅटट्रिक घेत इतिहास घडवला होता. सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या इरफानला तेव्हाचे प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांनी फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितले.

6 / 13

2006मध्ये त्याला कसोटी व वन डे संघातून वगळण्यात आले. त्यानंतर त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक चढउतार झाले. 2012मध्ये इरफान अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला.

7 / 13

इरफानने 29 कसोटीत 100 विकेट्स घेतल्या आहेत. 59 धावांत 7 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्यानं 120 वन डे सामन्यांत 173 आणि 24 ट्वेंटी-20 सामन्यांत 28 विकेट्स घेतले आहेत.

8 / 13

फेब्रुवारी 2016मध्ये इरफान लग्नबेडीत अडकला. त्याची पत्नी सफा बेग ही आखाती देशांत मॉडल होती.

9 / 13

हैदराबाद येथे 28 फेब्रुवारी 1994 साली तिचा जन्म झाला. पण, ती लहानाची मोठी सौदी अरेबियात झाली आणि तिथेच तिनं शिक्षण पूर्ण केलं.

10 / 13

सफा मध्यपूर्व आशियातील सुप्रसिद्ध मॉडल होती. अनेक फॅशन मॅगजीनच्या कव्हर पेजवर ती दिसली होती.

11 / 13

इरफान आणि सफा यांची दुबईत भेट झाली होती. दोन वर्षांच्या प्रेम संबंधानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

12 / 13

13 / 13

टॅग्स :इरफान पठाणसोशल व्हायरल