Join us  

MI Playing XI vs PBKS IPL 2022 : Mumbai Indiansच्या संघात मोठ्या बदलाचे Jasprit Bumrahचे संकेत, Kieron Pollardसह रोहित शर्मा कोणाला बाहेर बसवणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 11:31 AM

Open in App
1 / 8

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात एकही सामना न जिंकणारा Mumbai Indians हा एकमेव संघ राहिला आहे. चेन्नई सुपर किंग्सने सलग चार पराभवानंतर अखेर मंगळवारी पहिल्या विजयाची नोंद केली. आता सर्वांचे लक्ष मुंबई इंडियन्सच्या आजच्या पंजाब किंग्सविरुद्धच्या लढतीकडे लागले आहे.

2 / 8

कर्णधार रोहित शर्मा अजूनही या चार पराभवाची कारणे शोधतोय, तेच स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह याने आजच्या लढतीत मोठ्या बदलाचे संकेत दिले आहेत. याचा अर्थ डेवॉल्ड ब्रेव्हिस, बसील थम्पी यांना बाकावर बसवले जाऊ शकते.

3 / 8

मुंबई इंडियन्सला सलग चार पराभवांचा सामना करावा लागला आहे. त्यांच्याकडे डेथ ओव्हर ( अखेरच्या षटकांतील) स्पेशालिस्ट गोलंदाजांची कमतरता जाणवतेय. जसप्रीत बुमराहला आधी ट्रेंट बोल्टची साथ मिळत होती, परंतु बोल्टच्या तोडीचा जोडीदार सध्या मुंबईच्या ताफ्यात नाही. बुमराहचा फॉर्मही चिंतेचा विषय आहे आणि अशात रिली मेरेडिथ याला आज संधी मिळू शकते.

4 / 8

''आता आम्ही वर्तमानाचाच विचार करतोय. आम्ही ठरवल्याप्रमाणे गोष्टी घडलेल्या नाही, परंतु आम्ही संघर्ष करत राहणार आणि आम्ही मार्ग शोधू.. क्रिकेट हा असाच खेळ आहे. आव्हान समोर येतात तेव्हा तुम्ही त्याचा तोडणा शोधण्याचा प्रयत्न सुरू करता आणि आम्हीही तेच करणार आहोत,''असे जसप्रीत बुमराह म्हणाला.

5 / 8

डेवॉल्ड ब्रेव्हिसने आयपीएलमध्ये दणक्यात सुरुवात केली खरी, परंतु बेबी एबीला दडपण पेलण्याचा अनुभव नाही आणि त्याला आज बाकावर बसवले जाऊ शकते. बसील थम्पीने चांगली कामगिरी केली, परंतु त्याला सातत्या राखता आलेले नाही. रिली मेरेडिथसाठी त्याला आज विश्रांती दिली जाऊ शकते.

6 / 8

किरॉन पोलार्डलाही काही खास कामगिरी करता आलेली नाही, परंतु त्याचे स्थान सध्यातरी धोक्यात नाही. पण, जर त्याला बसवण्याचा विचार केला गेलाच, तर टीम डेव्हिड आणि हृतिक शोकीन यांच्यापैकी एकाला संधी दिली जाऊ शकते.

7 / 8

8 / 8

मुंबई इंडियन्सचा संभाव्य संघ - रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, किरॉन पोलार्ड, रमणदीप सिंग, मुरुगन अश्विन, जयदेव उनाडकत, जसप्रीत बुमराह, रिले मेरेडिथ

टॅग्स :आयपीएल २०२२मुंबई इंडियन्सपंजाब किंग्सजसप्रित बुमराह
Open in App