महिला प्रीमियर लीगच्या तिसऱ्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील मेलिया कर हिने यूपीचा अर्धा संघ तंबूत धाडत ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम नोंदवला.
WPL मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाकून खेळताना पाच विकेट्स घेणारी ती पहिली गोलंदाज ठरली.
महिला प्रीमियर लीगच्या आतापर्यंतच्या इतिहासात अमेलियाच्या आधी फक्त पाच जणींना पाच विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. आता त्या खास क्लबमध्ये मुंबई इंडिय्सच्या अमेलिया या सुंदरीचा समावेश झालाय.
एक नजर WPL मध्ये पाच विकेट्सचा खास विक्रमी डाव साधणाऱ्या सुंदरींवर...
WPL 2025 च्या हंगामात UPW विरुद्धच्या लढतीत मुंबई इंडियन्स (MI) कडून अमेलियानं ४ षटकात ३८ धावा खर्च करत ५ विकेट्स घेतल्या.
महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात आयरिश ऑस्ट्रेलियन किम गार्थनं गुजरातच्या संघाकडून खेळताना यूपीच्या संघाविरुद्ध ४ षटकात ३६ धावा खर्च करून पाच विकेट्स घेतल्या होत्या.
भारताची महिला क्रिकेटर आशा शोभना देखील फाइव्ह विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आहे. RCB कडून खेळताना २०२४ च्या हंगामात तिने यूपीच्या संघाविरुद्ध ४ षटकात २२ धावा खर्च करून ५ विकेट्स घेतल्या होत्या.
दक्षिण आफ्रिकेची मेरिझॅन कॅप हिने २०२३ च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना गुजरात विरुद्ध फक्त १५ धावा खर्च करत पाच विकेट्स घेतल्या होत्या.