Cricket Buzz»फोटो गॅलरी »MI vs KXIP Latest News : मुंबई इंडियन्सचा मोठा विजय, Point Tableमध्ये पटकावलं अव्वल स्थान!MI vs KXIP Latest News : मुंबई इंडियन्सचा मोठा विजय, Point Tableमध्ये पटकावलं अव्वल स्थान! By स्वदेश घाणेकर | Published: October 02, 2020 7:30 AMOpen in App1 / 12MI vs KXIP Latest News : गतविजेता मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) यांच्यात अबु धाबी येथे एकतर्फी सामना झाला. रोहित शर्मा ( Rohit Sharma)नं दमदार खेळ करताना अर्धशतक पूर्ण केले. या सामन्यात रोहितनं IPLमधील 5000 धावांचा विक्रम नावावर केला. 2 / 12त्यानंतर अखेरच्या षटकात हार्दिक पांड्या व किरॉन पोलार्ड यांनी दमदार फटकेबाजी करून मुंबई इंडियन्सला मोठी धावसंख्या उभारून दिली. फलंदाजांनी त्यांची भूमिका चोख बजावल्यानंतर MIच्या गोलंदाजांनीही त्यांच्या खांद्यावरील भार सक्षमपणे पेलला अन् संघाला विजय मिळवून दिला. 3 / 12किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलनं ( KL Rahul) नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. क्विंटन डी कॉक आणि सूर्यकुमार यादव यांना मोठी खेळी करता आली नाही. 4 / 12रोहित अन् इशान किशन ( Ishan Kishan) यांनी मुंबईचा डाव सावरला. इशान 23 धावांवर असताना रवी बिश्नोईनं त्याला जीवदान दिलं. त्यांची 62 धावांची भागीदारी 13व्या षटकात कृष्णप्पा गोवथमनं ( K. Gowtham) तोडली. इशान 28 धावांवर माघारी परतला. रोहित 45 चेंडूंत 8 चौकार व 3 षटकारांसह 70 धावांवर माघारी परतला. 5 / 12हार्दिक पांड्याचं ( Hardik Pandya) वादळानं KXIPच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. त्याच्या साथीला पोलार्ड होताच. त्यांच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईनं 4 बाद 191 धावा केल्या. हार्दिकनं 11 चेंडूंत नाबाद 30, तर पांड्यानं 20 चेंडूंत नाबाद 47 धावा केल्या. या दोघांनी 23 चेंडूंत नाबाद 67 धावा चोपल्या. 6 / 12धावांचा पाठलाग करताना लोकेश राहुल ( KL Rahul) आणि मयांक अग्रवाल ( Mayank Agarwal) यांनी चांगली सुरूवात करून दिली. पण, पाचव्या षटकात जसप्रीत बुमराहनं ( Jasprit Bumrah) मयांकचा ( 25) त्रिफळा उडवला. त्यानंतर कृणाल पांड्यानं ( Krunal Pandya) करुण नायरला भोपळाही फोडू न देता त्रिफळाचीत केलं. 7 / 12KXIPचे दोन फलंदाज 39 धावांत माघारी पतले. राहुल चहरच्या ( Rahul Chahar) गोलंदाजीवर स्कूप मारण्याच्या नादात KL Rahulचा त्रिफळा उडाला. KXIPनं 10 षटकांत 3 बाद 72 धावा केल्या. मुंबई इंडियन्सपेक्षा या धावा अधिक होत्या, परंतु KXIPनं एक अतिरिक्त विकेट गमावली होती. 8 / 12ग्लेन मॅक्सवेल आणि निकोलस पूरन यांनी चौथ्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी करताना KXIPच्या आशा कायम राखल्या. जेम्स पॅटिन्सननं ही भागीदारी संपुष्टात आणली. पूरननं 27 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकारांसह 44 धावा केल्या. 9 / 12KXIPचा अखेरचा आशास्थान मॅक्सवेलही उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद होऊन माघारी परतला. KXIPला 20 षटकांत 8 बाद 143 धावा करता आल्या. मुंबई इंडियन्सनं ( MI) हा सामना 48 धावांनी जिंकला. 10 / 12जसप्रीत बुमराहनं 18 धावांत दोन, राहुल चहरनं 26 धावांत दोन, जेम्स पॅटिसन्सनं 28 धावांत 2, कृणाल पांड्यानं 27 धावांत 1 विकेट घेतली. ट्रेंट बोल्टनंही एक विकेट घेतली. 11 / 12किंग्स इलेव्हन पंजाबवरील MIचा सर्वात मोठा विजय ठरला. यापूर्वी त्यांनी 2016मध्ये पंजाबवर 25 धावांनी विजय मिळवला होता. 12 / 12 आणखी वाचा Subscribe to Notifications