फ्रंटसिटवर बसलेल्या मुंबई इंडियन्सना श्रेयस गोपाळनं माघारी जाण्यास भाग पाडले. त्यानं एकाच षटकात रोहित शर्मा (35) व इशान किशन ( 0) यांना सलग चेंडूंवर बाद केले. हार्दिक पांड्या किंवा किरॉन पोलार्ड येणं अपेक्षित होतं, परंतु कृणाल पांड्याला आघाडीवर पाठवले. पण, कृणाल 12 धावा करून जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर माघारी परतला.