Cricket Buzz»फोटो गॅलरी »Mohammed Shami: मोहम्मद शमीला कोर्टाकडून मोठा झटका; हसीन जहाँला दरमहा द्यावी लागणार मोठी रक्कमMohammed Shami: मोहम्मद शमीला कोर्टाकडून मोठा झटका; हसीन जहाँला दरमहा द्यावी लागणार मोठी रक्कम By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 9:32 AMOpen in App1 / 10कोलकात्याच्या अलीपूर जिल्हा न्यायालयाने भारतीय संघाचा खेळाडू मोहम्मद शमीला अंतरिम देखभाल म्हणून हसीन जहाँला दरमहा 50,000 रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत.2 / 10अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आनंदिता गांगुली यांनी मोहम्मद शमीला अंतरिम भरणपोषण म्हणून पत्नी हसीन जहाँला दरमहा 50 हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. 3 / 10दरम्यान, मोहम्मद शमीला दर महिन्याच्या 10 तारखेला ही रक्कम भरायची आहे. याशिवाय 2018 मध्ये या प्रकरणादरम्यान कोर्टाने शमीला त्याच्या मुलीसाठी दरमहा 80 हजार रुपये द्यावे लागतील असा आदेश दिला होता. 4 / 10न्यायमूर्ती गांगुली यांनी सोमवारी दिलेल्या निकालात असेही सांगितले की, हा आदेश 2018 मध्ये खटला सुरू झाल्यापासून लागू होईल. म्हणजेच त्या वर्षी मार्चमध्ये गुन्हा दाखल झाल्यापासूनची थकबाकी शमीला भरावी लागणार आहे.5 / 10त्यामुळे भारतीय क्रिकेटपटूला आता प्रत्येक महिन्याला 1.30 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. न्यायमूर्ती आनंदिता गांगुली यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद शमीचे उत्पन्न 2020-21 या आर्थिक वर्षातील प्राप्तिकर विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. 6 / 10मोहम्मद शमीची त्या वर्षीची कमाई 7.19 कोटी एवढी होती. हसीन जहाँ दरमहा 10 लाख रुपये कमावते याचा कोणताही पुरावा नाही, त्यामुळे त्याची याचिका फेटाळण्यात आली आहे.7 / 102018 मध्ये हसीन जहॉंने उदरनिर्वाहासाठी 7 लाख रूपयांची मागणी केली होती. याशिवाय तिने आपल्या मुलीच्या शिक्षणाच्या खर्चासाठी तीन लाख रुपयांची मागणी केली होती, मात्र त्यावेळी न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला होता. 8 / 10हसीन जहॉं स्वतः मॉडेलिंग करून कमावते असे सांगण्यात आले. त्यामुळे शमीला कोणताही खर्च करावा लागणार नाही. त्या आदेशाला हसीन जहॉंने न्यायालयात आव्हान दिले होते. 9 / 10मात्र, हसीन न्यायालयाच्या निर्णयावर पूर्णपणे समाधानी नाही. तिने सांगितले की, शमी वर्षाला कोट्यवधी रुपये कमावतो. तसेच मुलीसह राहण्यासाठी अधिक पैसे लागतात. त्यामुळे ती याप्रकरणी उच्च न्यायालयात जाणार आहे. 10 / 10खरं तर मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांच्यात मागील पाच वर्षांपासून कायदेशीर लढाई सुरू आहे. त्यांना एक मुलगी देखील आहे. 2018 मध्ये हसीन जहाँने मोहम्मद शमीवर मारहाणीचे आरोप केले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications