Join us  

Morne Morkel नं नाराजीच्या सूरात केलं 'हार्दिक' स्वागत; इथं पाहा खास फोटो अन् त्यामागची स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2024 4:16 PM

Open in App
1 / 9

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ बांगलादेश विरुद्ध ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेतून दमदार कमबॅक करण्यासाठी हार्दिक पांड्या सज्ज झालाय.

2 / 9

६ ऑक्टोबरपासून रंगणाऱ्या टी-२० मालिकेत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. ते सधीचं सोन करण्यासाठी मेहनतही घेताना दिसते.

3 / 9

दमदार कमबॅकसाठी हार्दिक पांड्या कसून सराव करताना दिसला. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून काही खास फोटो शेअर केले आहेत.

4 / 9

या फोटोतून हार्दिक पांड्या बांगलादेश विरुद्धच्या मालिकेसाठी बॅटिंग-बॉलिंग दोन्ही क्षेत्रात छाप पाडण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येते.

5 / 9

हार्दिक पांड्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे. त्यामुळे त्याच्या कमबॅककडे चाहत्यांच्या नजरा लागून आहेत.

6 / 9

ग्वाल्हेर येथे रंगणाऱ्या बांगलादेश विरुद्धच्या टी-२० सामन्यासाठी हार्दिक पांड्याने नवा बॉलिंग कोच मॉर्ने मॉर्केलच्या मार्गर्दशनाखाली गोलंदाजीचा कसून सराव केल्याचे दिसून आले. नवा कोच अष्टपैलू खेळाडूला काही टिप्स देतानाही दिसून आले.

7 / 9

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, नव्या कोचला इम्प्रेस करण्यात हार्दिक पांड्या अपयशी ठरला. स्टम्पच्या खूपच जवळून गोलंदीज करत असल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज मॉर्ने मॉर्कल पांड्याच्या गोलंदाजीवर नाराज दिसला, असा उल्लेख वृत्तामध्ये करण्यात आला आहे.

8 / 9

नव्या कोचनं हार्दिकचं नाराजीच्या सूरात केलेल्या स्वागतानंतर त्याला गोलंदाजीत किती ओव्हर टाकण्याची संधी मिळणार? त्याची कामगिरी कशी राहणार ते पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

9 / 9

जवळपास तीन महिन्यानंतर क्रिकेटच्या मैदानात परतत असल्यामुळे बॅटिंग वेळीही त्याचा कस लागणार आहे.

टॅग्स :हार्दिक पांड्याभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघबांगलादेशटी-20 क्रिकेट