Join us  

विराटचा नाद करायचा नाय! RCB कडून सर्वाधिक धावा; अन्य संघांचे टॉपर पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 6:54 PM

Open in App
1 / 6

आयपीएल २०२३ मध्ये विराटने १४ सामन्यांत दोन शतकं व सहा अर्धशतकांसह ६३९ धावा केल्या आहेत. ट्वेंटी-२० क्रिकेटमधील हे त्याचे ८वे शतक ठरले अन् त्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक ७ शतकांचा विक्रम करताना ख्रिस गेलचा ( ६) विक्रम मोडला.

2 / 6

आयपीएलमध्ये सर्वाधिक ७२६३ धावांचा विक्रम विराटच्या नावावर आहे आणि एका फ्रँचायझीकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही तोच आहे. त्याने कर्णधार म्हणूनही RCBकडून ५००० धावा पूर्ण केल्या आहेत आणि रोहित शर्मालाच असा पराक्रम करता आलाय.

3 / 6

एका फ्रँचायझीकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराटनंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा क्रमांक येतो. २०१३ पासून या फ्रँचायझीसोबत असलेल्या रोहितने ५०२२ धावा केल्या आहेत.

4 / 6

Mr IPL सुरेश रैनाचा या क्रमवारीत तिसरा क्रमांक येतो. सुरेश रैनाने चेन्नई सुपर किंग्सकडून ४६८७ धावा केल्या आहेत. त्यापाठोपाठ कर्णधार महेंद्रसिंग धोनीने CSK साठी ४५०७ धावा केल्या आहेत.

5 / 6

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्स यानेही एकाच फ्रँचायझीकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये चौथे स्थान पटकावले आहे. तो ४४९१ धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे

6 / 6

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आणि सनरायझर्स हैदराबादचा माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नरनेही यंदाच्या पर्वात सातत्यपूर्ण कामगिरी केली, परंतु संघाला अपयश आले. वॉर्नरने SRH कडून ४०१४ धावा केल्या आहेत.

टॅग्स :आयपीएल २०२३विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरमुंबई इंडियन्स
Open in App