धोनीच्या निवृत्तीचा क्षण जवळ आल्याचे क्रिकेट वर्तुळात म्हटले जात आहे. धोनीच्या निवृत्तीबाबत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
धोनीचे निवृत्तीबाबतचे मत नेमके आहे तरी काय, हे अजून कोणालाही माहिती नाही.
निवृत्ती पत्करल्यावर काही माजी क्रिकेटपटू समालोचन आणि प्रशिक्षणाकडे वळले आहेत. पण धोनी नेमके काय करणार, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
धोनीने आपल्या भविष्याबाबत एक प्लॅन तयार केला आहे. या प्लॅननुसार त्याने काही गोष्टीही केल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी धोनी हा झारखंडच्या संघाला मार्गदर्शन करणार, असे वृत्त आले होते. पण या वृत्ताचे बऱ्याच जणांनी खंडन केले आहे.
धोनी निवृत्तीनंतर आपल्या क्रिकेट अकादमीवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे समजते.
युवा खेळाडूंना चांगले प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळावे, यासाठी धोनीने अकादमी सुरु केली आहे.
धोनीने आतापर्यंत नागपूर, इंदूर, पटणा, वाराणसी आणइ बोकारो येथे अकादमी सुरु केली आहे.
भारताबाहेरही धोनीची अकादमी कार्यरत आहे. दुबईमध्ये धोनीच्या अकादमीची शाखा आहे.
आता धोनीला आपल्या शहरात, म्हणजेच रांचीमध्ये अकादमी उभारायची आहे.
काही वृत्तांनुसार धोनी आपल्या बालपणीच्या मित्राबरोबर अकादमी रांचीमध्ये सुरु करणार आहे. धोनीचा मित्र मिहीर दिवाकर हा आर्का स्पोर्ट्स नावाची कंपनी चालवत आहे.