PHOTOS : लाडक्या माहीची कुटुंबीयांसोबत भटकंती; पत्नी साक्षीने शेअर केली झलक!

महेंद्रसिंग धोनीची कुटुंबीयांसोबत भटकंती.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू महेंद्रसिंग धोनी क्रिकेटपासून दूर असला तरी तो प्रसिद्धीच्या झोतात कायम असतो. केवळ आयपीएल खेळणारा माही कॅप्टन कूल म्हणून प्रचलित आहे.

सध्या तो पत्नी साक्षीसोबत भटकंती करत असल्याचे दिसते. त्याची पत्नी साक्षी धोनी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. साक्षीने भटकंतीचे काही फोटो शेअर केले आहेत.

धोनी भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने तीनवेळा आयसीसीचा किताब जिंकला आहे.

धोनी कर्णधार असताना भारताला एक ट्वेंटी-२० विश्वचषक, एक वन डे विश्वचषक आणि एक चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यात यश आले.

शेवटच्या वेळी २०१३ मध्ये टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रूपात आयसीसीचा किताब जिंकला होता. तेव्हापासून आजतागायत भारताच्या खात्यात ट्रॉफीचा दुष्काळ आहे.

साक्षी धोनीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये धोनी त्याच्या लाडक्या लेकीसोबत दिसत आहे.