वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूरच आहे.
वर्ल्ड कपनंतर झालेल्या दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, वेस्ट इंडिज, श्रीलंका या मालिकेत धोनी खेळलेला नाही.
भारतीय संघ पुढील मालिकेत ऑस्ट्रेलियाचा सामना करणार आहे आणि त्यानंतर न्यूझीलंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. याही मालिकेत धोनीची खेळण्याची शक्यता फार कमी आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेला धोनी कुटुंबासोबत वेळ घालवत आहे.
तो पत्नी साक्षी आणि मुलगी जिवासह मसूरी येथे पिकनिकला गेला आहे.
धोनीनं तेथे वर्षातील पहिल्या स्नो फॉलचा आनंद लुटला. यावेळी त्यानं जिवासह स्नोमॅनही तयार केला.
धोनीनं या कौटुंबिक सहलीचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यात धोनी जिवासहा फुल्ल टू धम्माल करताना दिसत आहे.
वर्ल्ड कपनंतर धोनी 15 दिवसांच्या सैन्यसेवेसाठी 106 TA बटालियन ( पॅरा) सोबत जम्मू-काश्मीरच्या खोऱ्यात पाहारा दिला होता.
धोनीच्या टीम इंडियातील पुनरागमनावर अजून चर्चा सुरू आहेत आणि इंडियन प्रीमिअर लीगनंतर त्यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.