Join us  

MS Dhoni बाबत शाहिद आफ्रिदी हे काय म्हणाला? India vs Pakistan सामन्यापूर्वी वादाला होणार सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2022 4:38 PM

Open in App
1 / 6

India vs Pakistan clash at T20 World Cup 2022 : पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी ( Shahid Afridi) याने आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी महत्त्वाचे विधान केले आहे. २३ ऑक्टोबरला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर IND vs PAK लढत होणार आहे.

2 / 6

मागील वर्ल्ड कप स्पर्धेत बाबर आजमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने प्रथमच भारतावर विजय मिळवला होता. यंदाही बाबर अँड कंपनी भारतासमोर कडवे आव्हान उभे करेल असा विश्वास आफ्रिदीने व्यक्त केला. महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) नेतृत्वाखाली खेळताना भारताने अनेकदा पाकिस्तानवर विजय मिळवला.

3 / 6

धोनीने एकप्रकारे भारत-पाकिस्तान यांच्यातली टशन एकतर्फी केली. त्याने पाकिस्तानला समोर कुठेच उभे राहू दिले नाही, परंतु बाबरच्या नेतृत्वाखाली आता पाकिस्तान भारताला चॅलेंज देण्यासाठी सज्ज झालाय. या वर्षभरात पाकिस्तानने दोन वेळा भारतावर विजय मिळवले.

4 / 6

दुबईत मागच्या वर्षी झालेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानने १० विकेट्स राखून भारतावर दणदणीत विजय मिळवला होता. त्यानंतर आशिया चषक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने परतफेड केली. पण, सुपर ४ गटात पाकिस्तानने पुन्हा विजय मिळवून भारताला अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाद केले.

5 / 6

''जर तुम्ही मागील काही वर्षांतील भारतीय संघाचा खेळ पाहाल, तर धोनीच्या काळात त्यांनी त्यांचा दृष्टीकोन बदललेला दिसेल. भारत-पाकिस्तान लढतीत तो तणाव असायचा, जी टशन असायची ती धोनीने नाहीशी केली. कारण, धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानवर सातत्याने विजय मिळवले. त्याने दृष्टीकोन बदलला आणि ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका या तगड्या संघांसोबत स्पर्धा सुरू केली,''असे आफ्रिदी म्हणाला.

6 / 6

त्याने पुढे म्हटले की,''त्या स्तरावर भारताच्या अव्वल फलंदाजांनी स्पर्धा करण्यास सुरुवात केली. मला हे सांगायला दुःख होतंय की धोनीने पाकिस्तानला खिजगणतीत ठेवले नव्हते. पण, आता गोष्ट बदलली आहे आणि आमचा संघ पुन्हा पूर्वीच्या फॉर्मात आलाय. बाबर आजमने संघाचा दृष्टीकोण बदलला आहे.''

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२2शाहिद अफ्रिदीमहेंद्रसिंग धोनी
Open in App