Join us  

IPL 2023, CSK vs RR: १५ वर्षात जे घडलं नव्हतं ते आताच का घडलं? MS Dhoni प्रामाणिकपणे केली चूक मान्य...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 1:36 PM

Open in App
1 / 6

MS Dhoni, IPL 2023 CSK vs RR: चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि महेंद्रसिंग धोनी हे समीकरण जसं खूप जुनं आणि अनुभवाचं आहे तसंच चेन्नईचं चेपॉक (Chepauk) स्टेडियमदेखील यातील तिसरा अंश आहे. धोनीच्या CSKचा गड मानल्या जाणाऱ्या चेपॉक मैदानावर तब्बल १५ वर्षांनी राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) विजय मिळवत इतिहास रचला.

2 / 6

प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सच्या संघाने जॉस बटलरच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर १७५ धावांपर्यंत मजल मारली. बटलरने ३६ चेंडूत ५२ धावा केल्या आणि संघाला विजयासाठी चांगली धावसंख्या गाठून दिली.

3 / 6

१७६ धावांचा पाठलाग करताना CSK संघ शेवटच्या चेंडूवर सामना हरला. तब्बल १५ वर्षांत जे घडलं नव्हतं ते Sanju Samsonच्या राजस्थान रॉयल्सने करून दाखवलं. त्यांनी चेपॉकवर चेन्नईला हरवून विजय मिळवला. चेन्नईचा त्या सामन्यात पराभव झाल्यानंतर, धोनीने अतिशय प्रामाणिकपणे आपली आणि संघाची चूक कबूल केली.

4 / 6

स्वत:च्या बॅटिंगबद्दल बोलताना धोनी म्हणाला, 'मी डोक्यात कोणताही फटका आधीच ठरवत नाही. गोलंदाजाने एखादी चूक करण्याची मी वाट पाहत असतो. शेवटच्या षटकात गोलंदाज दबावाखाली होता हे स्पष्ट दिसत होतं. मी सरळ रेषेत फटका मारण्याच्या विचारात होतो, पण मला ते जमलं नाही. पण आम्ही नक्कीच यापेक्षा चांगली कामगिरी करू शकलो असतो.'

5 / 6

खेळाचं गणित समजावून सांगत असताना धोनी म्हणाला- 'पिच संथ आणि फिरकीला मदत करणारे असते तर फलंदाजीची गती मंदावणे समजू शकले असते. पण चेपॉकच्या पिचवर स्पिनर्सला फारशी मदत मिळत नव्हती. मधल्या षटकांमध्ये आमच्या फलंदाजांनी फारच संथ खेळ केला. आम्ही दोघे फलंदाजांची शेवटची जोडी होतो, त्यामुळे फटकेबाजीसोबतच नेट रनरेटचा विचारही करावा लागला. सध्या स्पर्धेचे सुरूवातीचे दिवस आहेत त्यामुळे बेजबाबदारपणे खेळून आपली विकेट फेकणं हे फारसं चांगलं नाही ही गोष्ट आम्हा दोघांनाही माहिती होती.

6 / 6

नक्की चूक काय झाली याबद्दल बोलताना धोनीने महत्त्वाचा मुद्दा मांडला. 'आम्ही शक्य तितका सामना शेवटच्या चेंडूपर्यंत न्यायचा प्रयत्न करत होतो. पण एक गोष्ट आमची चुकलीच. आम्ही मधल्या वेळेत थोड्या जास्त एकेरी धावा घ्यायला हव्या होत्या. त्या आम्हाला शक्य झाले नाही. आणि आम्हाला पहिल्या चेंडूपासून फटकेबाजीही करता येत नव्हती. त्यामुळे थोडासा गोंधळ झाला,' अशी अतिशय प्रामाणिकपणे धोनीने आपली आणि संघाची चूक कबूल केली.

टॅग्स :आयपीएल २०२३महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सराजस्थान रॉयल्स
Open in App