Cricket Buzz»फोटो गॅलरी »Photo : महेंद्रसिंग धोनीला ट्रोल करण्यापूर्वी जाणून घ्या त्या फोटोमागचं सत्य; कराल कडक सॅल्यूट!Photo : महेंद्रसिंग धोनीला ट्रोल करण्यापूर्वी जाणून घ्या त्या फोटोमागचं सत्य; कराल कडक सॅल्यूट! By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 1:20 PMOpen in App1 / 5भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या कुटुंबीयांसोबत शिमला येथे सुट्टीवर गेला आहे. तो तेथे एका सुंदर कॉटेजमध्ये थांबला आहे आणि पण, एका फोटोवरून त्याला ट्रोल केले जात आहे. 2 / 5चेन्नई सुपर किंग्सनं सोशल मीडियावर धोनीचा एक फोटो पोस्ट केला. त्यात धोनीनं झाडं लावा, जंगल वाचला असा संदेश दिला आहे. पण, त्यानं हा संदेश एका लागडी फळीवर लिहिला आहे आणि त्यावरून तो ट्रोल होत आहे. 3 / 5झाडं लावण्याचा संदेश लाकडी फळीवर दिल्यानं नेटिझन्सनी धोनीलाच सवाल केला आहे. एकीकडे झाडं लावण्याचा संदेश देतोय अन् त्यासाठी लाकडी कापत आहेस. याला काय म्हणायचं, असा सवाल नेटिझन्सनी केला आहे.4 / 5पण, धोनीच्या या फोटोमागचं सत्य काही वेगळंच आहे. कचऱ्यात फेकलेल्या लाकडीचा वापर करून धोनीनं तो संदेश लिहिला आहे. मीनाबाग होम्सनं धोनीचा एक फोटो पोस्ट केला आणि त्यावरून हे स्पष्ट झाले. लाकडाच्या कारखान्यातील टाकाऊ लाकडाचा वापर करून धोनीनं तो संदेश लिहिला आहे.5 / 5अशा लाकडांचा वापर हिमाचल प्रदेशमध्ये सर्दीत जळणासाठी होतो. धोनीनं या टाकाऊ लाकडाचा योग्य वापर केला. आणखी वाचा Subscribe to Notifications