केंद्र सरकारचा 'तो' एक निर्णय MS Dhoniसाठी ठरू शकतो वेदनादायक; आवडत्या गोष्टीचा करावा लागेल त्याग

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कधी निवृत्त होईल, कुणीच ठामपणे सांगू शकत नाही.

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कधी निवृत्त होईल, कुणीच ठामपणे सांगू शकत नाही.

गतवर्षी झालेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. मार्चमध्ये आयोजित केलेल्या इंडियन प्रीमिअर लीगमधून ( आयपीएल) धोनी टीम इंडियात पुनरागमन करेल असे वाटले होते.

कोरोना व्हायरसमुळे आयपीएल दोन वेळा स्थगित करण्यात आली आणि त्यात ट्वेंटी-20 वर्ल्ड कपही स्थगित झाला आहे. त्यामुळे सप्टेंबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या आयपीएलमध्ये धोनी खेळेल, परंतु 2019चा वन डे वर्ल्ड कप हा त्याचा शेवटचा वर्ल्ड कप ठरण्याची शक्यता अधिक आहे.

त्यात आता केंद्र सरकारचा एक निर्णय धोनीसाठी वेदनादायक ठरू शकतो.

चीनच्या 59 अॅप्सवर बंदी घातल्यानंतर PUBG हा प्रसिद्ध व्हिडीओ गेम केंद्र सरकारच्या रडारवर आहे आणि आगामी काही दिवसांत त्यावरही बंदी घातली जाण्याची शक्यता आहे.

PUBGहा धोनीचा सर्वात आवडता गेम आहे आणि त्याची पत्नी साक्षीनंही हे अनेकदा सांगतिले आहे. शिवाय धोनी अनेकदा PUBG खेळतानाही दिसला आहे.

त्यामुळे केंद्र सरकारनं या गेमवर बंदी घातल्यास धोनीसाठी ते नक्कीच वेदनादायी ठरेल. धोनीसाठी हा गेमम्हणजे तणाव मुक्तीचे माध्यम असल्याचे साक्षीनं सांगितलं होतं.