Join us

Broom Broom... महेंद्रसिंग धोनीचं Bike कलेक्शन अन् त्यासाठी उभारलाय अलिशान बंगला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 10:15 IST

Open in App
1 / 10

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचं क्रिकेटनंतर जर कोणत्या गोष्टीवर प्रेम असेल तर ते बाईक्सवर म्हणावं लागेल.

2 / 10

त्याचं हे बाईक प्रेम वरवरच नाही, तर फक्त बाईक्ससाठी त्यानं रांचीच्या फार्महाऊसवर एक आलिशान बंगलाच उभारला आहे.

3 / 10

या आलिशान गॅरेजमध्ये पहिल्या बाईकपासून ते अनेक महागड्या बाईक्स आणि कारचा समावेश आहे. चला तर त्याच्या आवडत्या 6 बाईक्सबद्दल जाणून घेऊया..

4 / 10

यमाहा राजदूत ही धोनीची पहिली बाईक... त्याच्या या गॅरेजमध्ये अजूनही ही बाईक ठेवली आहे. त्यानं दोन मजली गॅरेज उभं केलं आहे.

5 / 10

कावासाकी निंजा ZX14R - जपान मोटरसायकलचा धोनी फार फॅन आहे. 2006मध्ये लाँच केलेली निंजा ZX14Rही आजच्या घडीला भारतातील सर्वात जलद धावणारी बाईक आहे आणि ती धोनीच्या गॅरेजमध्ये आहे. 20 लाख रुपये अशी या बाईकची किंमत आहे.

6 / 10

कावासाकी निंजा H2- 35 लाख किमतीची ही बाईक धोनीनं 2015मध्ये खरेदी केली. 320 ही या बाईकची टॉप स्पीड आहे.

7 / 10

Confederate X132 Hellcat - जगातील एकमेव सिंगल सीटर बाईक धोनीनं आयात केली आहे. त्यासाठी त्यानं 30 लाख रुपये मोजले.

8 / 10

हर्ली डेव्हिडसन - 19 लाखांची ही बाईक धोनीच्या गॅरेजमध्ये दिमाखात उभी आहे.

9 / 10

डुकाटी 1098S - इटालियन बाईकही धोनीकडे आहे. 2007मध्ये ही बाईक लाँच करण्यात आली आणि धोनीनं तिचं S व्हर्जन खरेदी केलं आहे.

10 / 10

यमाहा थंडरकॅट - 1996मध्ये ही बाईक लाँच करण्यात आली आहे.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीबाईक