इंडियन प्रीमियर लीग (IPL) 22 मार्च 2025 पासून सुरू होत आहे. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग मानल्या जाणाऱ्या IPL चे अधिकृत प्रसारण Jiostar वर दाखवले जाणार आहे.
या आयपीएलसाठी जाहिरातदार आणि प्रायोजकांनी योजना आखायला सुरुवात आहे. या वर्षी दर्शकसंख्या 1 अब्जपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे. 2024 मध्ये JioStar अंतर्गत स्टार स्पोर्ट्सने 525 मिलियन दर्शकांपर्यंत पोहोचण्याचा विक्रम केला होता.
आयपीएलमध्ये 10 सेकंदाच्या जाहिरातीसाठी 18 लाख ते 19 लाख रुपये आकारले जातात. ही रक्कम टीव्ही आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरील जाहिरातींसाठी आहे. पण यावेळी बाजार तज्ञांचा अंदाज आहे की आयपीएल 2025 मध्ये जाहिरात दर 20-30% वाढू शकतात.
हे लीगची सतत वाढणारी लोकप्रियता आणि व्यापक प्रेक्षकांची पोहोच दर्शवते. JioStar ने यंदाच्या हंगामासाठी मोठी योजना आखली आहे. कंपनीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार कोट्यवधी प्रेक्षकांपर्यंत पोहचण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.
जिओस्टारचे मुख्य व्यवसाय अधिकारी इशान चॅटर्जी सांगतात की, IPL 2025 साठी जाहिरातदारांकडून अभूतपूर्व मागणी आहे. नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील भारत-पाकिस्तान सामना पाहिल्यास, त्यात सर्वाधिक प्रेक्षकांनी पाहिलेला सामना होता.
हा ट्रेंड पाहता आयपीएल 2025 देखील दर्शकांच्या संख्येत नवीन विक्रम निर्माण करेल अशी अपेक्षा आहे. JioStar, जे आता स्टार स्पोर्ट्स आणि JioCinema, दोन्ही ऑपरेट करतात, त्यांच्या जाहिरात शुल्कात 15% वाढ केली आहे.