मुकेश कुमारची लग्नासाठी सुट्टी! कोण आहे दिव्या सिंग? जी होणार गोलंदाजाची पत्नी

भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मुकेश कुमार ( Mukesh kumar) याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यापूर्वी सुट्टी मागितली. तो विवाह करणार असल्याने त्याची सुट्टी बीसीसीआयने मंजूर केली.

मुकेशने त्याची मैत्रिण दिव्या सिंहसोबत याच वर्षी फेब्रुवारीत साखरपुडा केला होता. आयपीएल २०२३ संपल्यानंतर मुकेश कुमार दिव्याशी लग्न करणार होता आणि अखेर तो दिवस आला.

मुकेश कुमारचा टीम इंडियापर्यंतचा प्रवास संघर्षमयी आहे... दिव्या ही बिहारमधील छपरा येथील रहिवासी आहे. मुकेश कुमार यांनी त्यांच्या सोशल मीडियावर दिव्यासोबतच्या रिंग सेरेमनीचे फोटो शेअर करून ही माहिती दिली होती.

मुकेश कुमार आणि दिव्या एकमेकांना आधीच ओळखतात. दिव्या सिंग एका सामान्य कुटुंबातून येते. दिव्या आणि मुकेश यांच्या कुटुंबियांव्यतिरिक्त जिल्ह्यातील अनेक प्रतिष्ठित लोक साखऱपुड्याला नवीन जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी आले होते.

मुकेश कुमारच्या आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्सनेही त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता आणि त्याला नवीन खेळीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या.

बिहारचे रहिवासी असलेले मुकेश कुमार यांनी बंगालमधून आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली. त्याने बंगाल क्रिकेटमधून अंडर-१९ क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यानंतर, दीर्घकाळ रणजी ट्रॉफीमध्ये खेळल्यानंतर त्याला २०२२ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारत अ संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. या सामन्यात त्याने ३६ धावांत पाच विकेट घेतल्या होत्या