Join us

MI नं या ७ खेळाडूंवर लावली कोट्यवधींची बोली; इथं पाहा महागड्या खेळाडूंसह बहरलेला परफेक्ट संघ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 14:12 IST

Open in App
1 / 9

ताफ्यातील स्टार खेळाडूंना रिटेन करण्याचा यशस्वी डाव खेळताना अधिक पैसा खर्च केल्यानंतर २० लाख शिल्लक ठेवत MI नं उत्तम संघ बांधणी केलीये. एक नजर महागड्या खेळाडूंसह MI नं केलेल्या परफेक्ट संघ बांधणीवर

2 / 9

न्यूझीलंडचा स्टार बॉलर ट्रेंट बोल्ट पुन्हा एकदा जसप्रीत बुमराहच्या साथीला दिसणार आहे. MI नं १२ कोटी ५० लाख खर्च करून त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. लिलावात खरेदी केलेला MI संघाचा तो सर्वात महागडा खेळाडू आहे.

3 / 9

CSK च्या ताफ्यातून खेळताना दिसलेल्या दीपक चाहरसाठी MI नं ९ कोटी २५ लाख एवढी रक्कम मोजली.

4 / 9

अनकॅप्ड नमन धीर याला मुंबई इंडियन्सच्या संघाने ५ कोटी २५ लाख रुपयांसह पुन्हा आपल्या ताफ्यात सामील करून घेतले.

5 / 9

MI च्या ताफ्यातून टीम डेविडही निघून गेला. त्याची परफेक्ट रिप्लेसमेंट म्हणून इंग्लंडचा स्टार वील जॅक्सवर संघानं ५ कोटी २५ लाख रुपयांची बोली लावली.

6 / 9

अल्लाह गझनफरसाठी मुंबई इंडियन्सच्या संघाने तब्बल ४ कोटी ८० लाख रूपये मोजले.

7 / 9

न्यूझीलंडच्या मिचेल सँटनरसाठी मुंबई इंडियन्सच्या संघाने २ कोटी मोजले आहेत.

8 / 9

इशान किशनवर डाव न खेळता यावेळी विकेट किपर बॅटरच्या रुपात MI नं दक्षिण आफ्रिकेच्या रायन रिकल्टनवर १ कोटींचा डाव खेळला.

9 / 9

एका नजरेत पाहा मुंबई इंडियन्सचा संघ

टॅग्स :आयपीएल २०२४आयपीएल लिलावमुंबई इंडियन्सआकाश अंबानीनीता अंबानीटी-20 क्रिकेट