Join us  

IPL 2023: मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्माचा 'फ्लॉप शो' टीम इंडियासाठी 'गुड न्यूज', कसं काय... जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2023 6:24 PM

Open in App
1 / 7

Rohit Sharma Mumbai Indians Team India: IPL 2023 मध्ये रोहित शर्माची बॅट फारशी कमाल दाखवू शकलेली नाही . दोन वेळा तो शून्यावरही बाद झाला आहे. रोहितची फलंदाजीची सरासरी २० पेक्षा कमी आहे. स्ट्राइक रेट 130 च्या खाली आहे. रोहित शर्माच्या चाहत्यांना हे आकडे अजिबात आवडणार नाहीत हे स्पष्ट आहे.

2 / 7

पण असे असले रोहित शर्माचे आयपीएलमधील अपयश भारतीय संघासाठी चांगले मानले जात आहे. कारण जर रोहित शर्मा आयपीएलमध्ये अपयशी ठरला, तर त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विशेषत: आयसीसी स्पर्धांमध्ये त्याने दमदार कामगिरी केल्याचा इतिहास साक्ष आहे.

3 / 7

IPL 2023 नंतर टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळायची आहे. लंडनच्या ओव्हल मैदानावर ७ जूनपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध जेतेपदाचा सामना सुरू होणार आहे. आयपीएलमध्ये हिटमॅनची बॅट जरी शांत राहिली तरी त्याने WTC Finalच्या सामन्यात धावा केल्या पाहिजेत, हे रोहितच्या चाहत्यांना नक्कीच आवडेल. आयपीएलमध्ये अपयशी ठरल्यानंतर रोहित शर्माने आयसीसी टूर्नामेंटमध्ये कशी दमदार कामगिरी करतो, ते पाहूया.

4 / 7

IPLच्या गेल्या पाच हंगामातील आकडेवारी पाहिली तर रोहित शर्माने या स्पर्धेत खराब कामगिरी केली, पण त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने दमदार कामगिरी केली. IPL 2017 मध्ये रोहित शर्माने 23.78 च्या सरासरीने फक्त 333 धावा केल्या होत्या. मात्र आयपीएलनंतर झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहित शर्माने वर्चस्व गाजवले. रोहितने 5 सामन्यात 76 च्या सरासरीने 304 धावा केल्या. या दरम्यान त्याच्या बॅटमधून 1 शतक आणि 2 अर्धशतके झळकली.

5 / 7

रोहित शर्माने २०१९ वर्ल्ड कप केली होती कमाल- रोहित शर्मासाठी IPL 2019 चांगले नव्हते. या खेळाडूला 15 सामन्यांत 28.92 च्या सरासरीने फक्त धावा करता आल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेटही 130 पेक्षा कमी होता. पण आयपीएलनंतर झालेल्या विश्वचषकात रोहित शर्माने पाच शतकांच्या जोरावर ६४८ धावा केल्या. रोहितची सरासरीही ८१ होती.

6 / 7

2021च्या T20 विश्वचषकातही रोहित होता तुफान हिट- 2021 मध्येही रोहित शर्मा आयपीएलमध्ये विशेष काही करू शकला नाही. यावेळीही त्याची सरासरी ३० पेक्षा कमी होती. स्ट्राइक रेट 130 च्या खाली राहिला. पण टी-20 वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माने खूप धावा केल्या. २०२१ च्या टी२० विश्वचषकात तो भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू होता. रोहितने 34.79 च्या सरासरीने 174 धावा केल्या आणि त्याचा स्ट्राईक रेटही 150 पेक्षा जास्त होता.

7 / 7

गेल्या 4 पैकी 3 वर्षांत असेच घडले आहे. यावेळीही तसेच होईल अशी आशा आहे. आयपीएलचा सध्याचा हंगामही रोहित शर्मासाठी वाईट गेला आहे. त्यामुळे आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये तो काय करतो हे पाहायचे आहे.

टॅग्स :आयपीएल २०२३रोहित शर्मामुंबई इंडियन्सभारतीय क्रिकेट संघट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२
Open in App