मुंबई : मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये सर्वाधिक जेतेपद नावावर केली. 2015च्या जेतेपदात सिंहाचा वाटा उचलणारा खेळाडू आता लग्नबंधनात अडकला आहे. त्यानं सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. मुंबई इंडियन्सनेही या नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मुंबई इंडियन्सचा हा खेळाडू कोण?
न्यूझीलंडचा प्रमुख गोलंदाज मिचेल मॅक्लेघन असे त्याचे नाव आहे. त्याने प्रेयसी जॉर्जिया इंग्लंड हिच्याशी विवाह केला आहे. दोघेही बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते आणि अखेरीस त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आयपीएल स्पर्धेदरम्यान मॅक्लेघनला चिअर करण्यासाठी जॉर्जिया भारतात अनेकदा आली होती. या दोघांनी नुकताच साखरपुडा केला होता.
न्यूझीलंडच्या या वेगवान गोलंदाजाचं याआधी एक बार गर्ल रीनी ब्राऊन हिच्याशी अफेअर होते. 2012 मध्ये त्यांची भेट झाली होती. रीनीने एका मुलाखतीत त्यांच्या नात्याबद्दल खुलासा केला होता. पण काही कालांतरानंतर दोघांचा ब्रेकअप झाला.
मॅक्लेघनने मुंबई इंडियन्सच्या जेतेपदाच्या वाटचालीत अनेकदा महत्त्वाची भूमिका वटवली आहे. 33 वर्षीय मॅक्लेघनने 48 वन डे आणि 29 ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत किवी संघाचे प्रतिनिधित्व करताना अनुक्रमे 82 व 30 विकेट्स घेतल्या आहेत.
2016 मध्ये न्यूझीलंडकडून अखेरचा सामना खेळला आहे. त्याने 2015, 2017 आणि 2019 च्या मुंबई इंडियन्सच्या जेतेपदात महत्त्वाचा वाटा उचलला आहे. आयपीएलमध्ये त्याने 56 सामन्यांत 71 विकेट्स घेतल्या आहेत. 21 धावांत 4 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.