ऑस्ट्रेलियाची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूंपैकी एक एलिसा पेरीनं नुकतंच घटस्फोट घेतला. ऑस्ट्रेलियाचा रग्बीपटू मॅट टूमूआ आणि एलिसा यांनी एकमेकांच्या परवानगीनं हा निर्णय घेतला.
एलिसानं सोशल मीडियावर हे जाहीर करताच अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं.
2012मध्ये सिडनी विमानतळावर एलिसा आणि मॅट यांची पहिली भेट झाली होती. त्यानंतर 2013मध्ये रग्बी पुरस्कार सोहळ्यात या दोघांना एकत्र पाहिलं गेलं होतं.
त्यानंतर वर्षभराच्या आतच या दोघांनी साखरपुडा केला अऩ् 2015मध्ये विवाह केला.
एलिसाच्या निर्णयानंतर भारताचा सलामीवीर मुरली विजय याला ट्रोल केलं
नुकतंच मुरली विजयनं एलिसासोबत डिनर डेटला जायला आवडेल, अशी इच्छा व्यक्त केली होती.
एलिसानंही त्याची ही डेट मंजूर करताना बिल मात्र तुला भरावं लागेल, अशी अट मुरलीसमोर ठेवली होती.
मुरली विजयचेही लग्न झालेलं आहे. त्याच्या पत्नीचं नाव निकिता आहे आणि दोघांनी तीन मुलं आहेत.
निकिता ही दिनेश कार्तिकची पत्नी होती, परंतु मुरलीसोबत अफेअर असल्यानं कार्तिकनं तिला घटस्फोट दिला.