Join us  

Mystery Girl IPL 2022 MI vs DC Live Updates : २०१९नंतर 'ती' मिस्ट्री गर्ल पुन्हा दिसली; Mumbai Indiansच्या फलंदाजासाठी खास स्टेडियमवर आली, Photo

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 10:09 PM

Open in App
1 / 11

IPL 2022 Mumbai Indians vs Delhi Capitals Live Updates : दिल्ली कॅपिटल्सचा संघ दडपणाखाली खेळला. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी सुरेख कामगिरी करताना पहिल्या १० षटकांत DC ला ४ धक्के दिले. रोव्हमन पॉवेल व रिषभ पंत यांनी ७५ धावांची भागीदारी करून दिल्लीला ट्रॅकवर आणले. जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) आज स्टार ठरला. त्याने दिल्लीच्या तीन प्रमुख फलंदाजांना माघारी पाठवले.

2 / 11

डेव्हिड वॉर्नर ( ५), मिचेल मार्श ( ०), पृथ्वी शॉ ( २४) आणि सर्फराज खान ( १०) हे फलंदाज माघारी परतल्याने दिल्लीच्या ४ बाद ५० धावा धाल्या होत्या. रोव्हमन पॉवेल व रिषभ पंत यांनी पाचव्या विकेटसाठी ७५ धावा जोडल्या. रिषभ ३९ धावांवर बाद झाला. रोव्हमनने ३४ चेंडूंत १ चौकार व ४ षटकारासह ४३ धावा केल्या.

3 / 11

बुमराहने ४ षटकांत २५ धावांत ३ विकेट्स घेतल्या. दिल्लीने ७ बाद १५९ धावा केल्या. अक्षरने नाबाद १९ धावा केल्या. मयांक मार्कंडेने ४ षटकांत २६ धावांत १ विकेट घेतली, तर हृतिक शोकिनने ४ षटकांत ३४ धावा दिल्या. रमणदीप सिंगने २ षटकांत २९ धावांत २ विकेट्स घेतल्या. डॅनिएल सॅम्सला एक विकेट मिळाली.

4 / 11

या सामन्यात एका मिस्ट्री गर्लची चर्चा रंगली आणि मुंबई इंडियन्सचा सलामीवीर इशान किशन याच्यासाठी ती खास स्टेडियमवर आल्याची चर्चा रंगली. २०१९मध्ये पहिल्यांचा मुंबई इंडियन्सच्या सामन्यात ती दिसली होती आणि त्यानंतर आज ती मॅच पाहायला आलेली दिसली

5 / 11

6 / 11

अदिती हुंडिया ( Aditi Hundia) असे तिचे नाव आहे. इशान किशनचे नाव अदिती हुंडिया हिच्याशी जोडले जात असून, अदितीसुद्धा सोशल मीडियावर नेहमीच इशान किशनचे कौतुक करताना दिसून येते.

7 / 11

अदिती हुंडिया हिचा जन्म १५ जानेवारी १९९७ रोजी राजस्थानमधील जयपूर येथे झाला होता.

8 / 11

अदिती हुंदिया २०१९ च्या आयपीएलदरम्यान चर्चेत आली होती. त्यावेळी मुंबईने चेन्नईला नमवत विजेतेपद पटकावले होते. त्यानंतरच इशानचे नाव अदितीसोबत जोडले जाऊ लागले होते.

9 / 11

अदितीने आपल्या मॉडेलिंग करिअरची सुरुवात २०१६ मध्ये एलिट मिस राजस्थानमधून केली होती. त्या स्पर्धेत ती दुसऱ्या क्रमांकावर राहिली होती.

10 / 11

तिने फेमिना मिस इंडिया राजस्थानचे विजेतेपद पटकावले होते. तसेच फेमिना मिस इंडिया २०१७ मध्ये ती पहिल्या १५ स्पर्धकांमध्ये राहिली होती.

11 / 11

अदितीने २०१८ मध्ये सुपरनॅचरलचे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर तिला मिस युनिव्हर्स २०१८ मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली होती.

टॅग्स :आयपीएल २०२२मुंबई इंडियन्सदिल्ली कॅपिटल्सइशान किशन
Open in App