Join us  

T20 WC 2024 : भारत नाही! PAK vs AUS अशी फायनल होईल; ऑस्ट्रेलियन दिग्गजाचा दावा

By ओमकार संकपाळ | Published: May 31, 2024 12:43 PM

Open in App
1 / 9

ट्वेंटी-२० विश्वचषकाचे प्रबळ दावेदार म्हणून भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज या संघांकडे पाहिले जात आहे. आगामी विश्वचषकाची उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी कोणते संघ गाठतील याबद्दल माजी खेळाडूंसह विश्लेषक आपापला अंदाज व्यक्त करत आहेत.

2 / 9

अशातच ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू नॅथन लायनने विश्वचषकाचे फायनलिस्ट म्हणून पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या संघांची नावे घेतली. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रसारित करून विश्वचषकाबद्दल भाष्य केले आहे.

3 / 9

नॅथन लायन म्हणाला की, विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलिया जाईल हे निश्चित आहे. कारण मला माझ्या संघावर विश्वास आहे. दुसरीकडे पाकिस्तान आमच्याशी अंतिम फेरीत भिडेल असे मला वाटते. हे माझे वैयक्तिक मत आहे. पाकिस्तानच्या संघात चांगले फिरकीपटू असून, बाबर आझमसारखा स्टार फलंदाज आहे.

4 / 9

२ दोन जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषक खेळवला जात आहे. आगामी स्पर्धेचा प्रबळ दावेदार म्हणून भारतीय संघाकडे पाहिले जात आहे.

5 / 9

विविध देशातील माजी खेळाडू भविष्यवाणी करत असून कोण प्रभावी ठरेल याबाबत भाष्य करत आहे. अलीकडेच वेस्ट इंडिजचा दिग्गज ब्रायन लाराने विश्वचषकाचे चार सेमीफायनलिस्ट जाहीर केले. यामध्ये त्याने बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघावर विश्वास दाखवला नाही.

6 / 9

भारत, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान आणि विश्वविजेता इंग्लंडचा संघ सेमीफायनसाठी पात्र ठरेल, असे ब्रायन लाराने म्हटले होते.

7 / 9

बाबर आझम (कर्णधार), अबरार अहमद, आझम खान, फखर जमान, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वासीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद आमिर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सैम अयुब, शादाबखान, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान खान.

8 / 9

मिचेल मार्श (कर्णधार), ॲश्टन अर्गर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेझलवुड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, ॲडम झाम्पा.

9 / 9

अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा.

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024पाकिस्तानआॅस्ट्रेलियाआयसीसी