चाहत्यांचा लाडका हिटमॅन अर्थात रोहित शर्मा नाना कारणांनी चर्चेत असतो. अलीकडेच त्याने कर्जत जामखेडमध्ये हजेरी लावली होती. आता रोहितचे काही लेटेस्ट फोटो सर्वांचे लक्ष वेधत आहेत.
भारताने बांगलादेशचा कसोटी मालिकेत धुव्वा उडवल्यानंतर रोहित सुट्टीचा आनंद घेत आहे. दरम्यान, अबुधाबीमध्ये होत असलेल्या एनबीए इव्हेंटमधील त्याचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. यामध्ये त्याची पत्नी रितिका सजदेहही त्याच्यासोबत दिसत आहे.
रोहित शर्माचा महान फुटबॉल गोलरक्षक इकर कॅसिलाससोबतचा एक फोटोही व्हायरल होत आहे.
चार तारखेला अबू धाबी येथील एतिहाद एरिना येथे डेन्व्हर नगेट्स आणि बोस्टन सेल्टिक्स यांच्यात सामना झाला. यावेळी रोहित पत्नीसह उपस्थित होता. NBA ने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रोहित शर्माचा फोटो शेअर केला आहे.
शुक्रवारी एका सामन्यादरम्यान रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका सजदेह यांनी स्पॅनिश फुटबॉलचा महान गोलरक्षक इकर कॅसिलासची भेट घेतली.
इकर कॅसिलास हा फुटबॉल जगतातील सर्वोत्तम गोलरक्षकांपैकी एक मानला जातो.
दरम्यान, रोहित आणि रितीका यांचा एक रोमँटिक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये रोहितचे स्मित पाहून रितीका लाजते... हा क्षण चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
उत्कृष्ट खेळ आणि अप्रतिम चपळता यामुळे कॅसिलासने फुटबॉल जगतात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली स्पेनने २००८ मध्ये UEFA युरो चॅम्पियनशिप आणि २०१० मध्ये फिफा विश्वचषक जिंकला.
रोहितचा स्वॅग पाहून चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. रोहित-रितीकासोबत बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी देखील दिसत आहे.