Devon Conway CSK IPL2022 : Mumbai Indians चा सामना करण्याआधीच चेन्नई सुपर किंग्सच्या परदेशी खेळाडूने बायो-बबल सोडला; मायदेशात परतण्याचा निर्णय घेतला

CSK batter Devon Conway leaves IPL 2022 for his wedding - इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सला आतापर्यंत ६ सामन्यांत एकच विजय मिळवता आलेला आहे. त्यात गुरुवारी त्यांच्यासमोर पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सचे आव्हान आहे.

CSK batter Devon Conway leaves IPL 2022 for his wedding - इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सला आतापर्यंत ६ सामन्यांत एकच विजय मिळवता आलेला आहे. त्यात गुरुवारी त्यांच्यासमोर पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सचे आव्हान आहे.

मुंबई इंडियन्सला एकही विजय मिळवता न आल्याने CSKविरुद्धचा सामना त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. MI व CSK हे दोन्ही संघ आता IPL 2022 मध्ये टीकून राहण्यासाठी धडपडताना दिसत आहेत. अशात चेन्नईचा सलामीवीर डेवॉन कॉनवे ( Devon Conway) याने मायदेशात परतण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑक्शनमध्ये CSKने न्यूझीलंडच्या डेव्हॉन कॉनवे याला १ कोटींत आपल्या ताफ्यात घेतले. कॉनवेने २० आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यांत ५०.१६च्या सरासरीने ६०२ धावा केल्या आहेत आणि नाबाद ९९ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे. डेव्हॉन कॉनवेचा जन्म दक्षिण आफ्रिकेतला परंतु तो न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व करतो.

२३ जुलै २०२०मध्ये त्याने गर्लफ्रेंड किम वॉटसनसोबत साखरपुडा केला आणि आता या दोघांची लग्नगाठ बांधली जाणार आहे. त्याच्या लग्नाच्या आधीचा सोहळा CSK च्या खेळाडूंनी दणक्यात साजरा केला आणि आता कॉनवे आयपीएल बायो बबल सोडून मायदेशी परतणार असल्याचे वृत्त समोर येत आहे.

३० वर्षाच्या कॉनवेने नोव्हेंबर २०२०मध्ये न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मॅथ्यू सिनक्लेअर यांच्यानंतर कसोटी पदार्पणात द्विशतक झळकावणारा कॉनवे हा न्यूझीलंडचा दुसरा, तर जगातला सातवा फलंदाज ठरला.

कॉनवे त्याच्या लग्नासाठी दक्षिण आफ्रिकेत परत जाणार आहे आणि त्यामुळे किमान आठवडाभर तो आयपीएल २०२२पासून दूर राहणार आहे. कॉनवेने आतापर्यंत एकच सामना खेळला आहे. ESPNcricinfo च्या वृत्तानुसार न्यूझीलंडचा हा सलामीवार २४ एप्रिलला CSKच्या ताफ्यात परतणार आहे. पण, कोरोना नियमांमुळे त्याला तीन दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. त्यामुळे किमान दोन सामने त्याला खेळता येणार नाहीत.