Cricket Buzz»फोटो गॅलरी »NZ vs PAK : न्यूझीलंडच्या विजयानं टीम इंडियाचं टेंशन वाढवलं; अजिंक्य रहाणेची कसोटी!NZ vs PAK : न्यूझीलंडच्या विजयानं टीम इंडियाचं टेंशन वाढवलं; अजिंक्य रहाणेची कसोटी! By स्वदेश घाणेकर | Published: January 06, 2021 10:10 AMOpen in App1 / 11New Zealand vs Pakistan : केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघानं ऐतिहासिक कामगिरी केली. दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानचा धुव्वा उडवून न्यूझीलंडनं इतिहासात प्रथमच जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. 2 / 11न्यूझीलंडनं दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानवर एक डाव व १७६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. न्यूझीलंडनं पहिल्या डावात घेतलेल्या ३६२ धावांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचा दुसरा डाव १८६ धावांवर गडगडला. 3 / 11या विजयासह न्यूझीलंडनं कसोटी मालिका २-० अशी खिशात घातली आणि ICC कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाला मागे टाकून अव्वल स्थान पटकावले. न्यूझीलंडच्या या मालिका विजयानं टीम इंडियाचं टेंशन वाढवलं आहे.4 / 11न्यूझीलंडच्या कायले जेमिन्सननं ६९ धावांत ५ विकेट घेत पाकिस्तानला मोठे धक्के दिले. पाकिस्तानच्या पहिल्या डावातील २९७ धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडने ६ बाद ६५९ धावांवर पहिला डाव घोषित करून ३६२ धावांची आघाडी घेतली. केन विलियम्सन व हेन्री निकोल्स यांनी चौथ्या विकेटसाठी विक्रमी ३६९ धावांची भागीदारी केली.5 / 11निकोल्स २९१ चेंडूंत १८ चौकार व १ षटकार मारून १५७ धावांवर माघारी परतला. विलियम्सननं ३६४ चेंडूंत २८ चौकारांसह २३८ धावा केल्या. डॅरील मिचेलनं ११२ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह नाबाद १०२ धावा केल्या. न्यूझीलंडनं ६ बाद ६५९ धावांवर डाव घोषित करून पहिल्या डावात ३६२ धावांची आघाडी घेतली.6 / 11पाकिस्तानचा दुसरा डावही गडगडला. कायले जेमिन्सननं पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करताना सहा विकेट्स घेतल्या. ट्रेंट बोल्टनं ३ विकेट्स घेत त्याला साथ दिली. फलंदाजीत कमाल दाखवणाऱ्या केननं गोलंदाजीवरही हात आजमावला आणि कसोटीतील पहिली विकेट नावावर केली. 7 / 11या विजयानंतर न्यूझीलंडच्या खात्यात ११८ गुण जमा झाले आहेत. ऑस्ट्रेलिया ( ११६) व भारत ( ११४) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत.न्यूझीलंडनं प्रथमच आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. 8 / 11प्रथमच त्यांनी सलग सहा कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे. घरच्या मैदानावर मागील १७ सामन्यांत त्यांनी अपराजित मालिका कायम राखली आहे. २०११नंतर त्यांनी घरच्या मैदानावर एकाही कसोटीत पराभूत पत्करलेला नाही. 9 / 11न्यूझीलंडनं या विजयानंतर ICC World Test Championship स्पर्धेतही १२० गुणांची कमाई केली. न्यूझीलंडच्या खात्यात ४२० गुण जमा झाले आहेत आणि ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत.10 / 11ऑस्ट्रेलिया ( ३२२) आणि टीम इंडिया ( ३९०) गुणांसह अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहेत. सरासरीच्या जोरावर या दोघांनी न्यूझीलंडला मागे ठेवले आहे. पण, टीम इंडिया ( ०.७२२) आणि न्यूझीलंड ( ०.७०) यांच्या सरासरीत फार अंतर नाही. 11 / 11ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पराभव आता भारताला महागात पडू शकतो. तसे झाल्यास न्यूझीलंड दुसऱ्या स्थानी सरकेल व टीम इंडिया अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडू शकते. आणखी वाचा Subscribe to Notifications