परदेशात समलैंगिक विवाह ही काही नवीन गोष्ट नाही. क्रीडा विश्वात असे अनेक जोडपं आहेत. अशाच एका समलैंगिक जोडप्याच्या घरात पाळणा हलला आहे.
न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाची स्टार अॅमी सॅथरवेट आणि ली ताहूहू या जोडप्यानं नवीन पाहूणा येणार असल्याची घोषणा केली.
अॅमी आमि ली हे लेस्बियन जोडपं आहेत आणि त्यांनी 2014मध्ये साखरपुडा केला होता.
त्यानंतर मार्च 2017मध्ये या दोघांनी विवाह केला.
न्यूझीलंडनं 2013मध्ये LGBT कायद्याला मान्यता दिलेली आहे आणि त्यानंतर या दोघांनी आपलं नातं जगजाहीर केलं होतं. 2010पासून या दोघींचं प्रेमसंबंध आहेत.
महिला क्रिकेटमध्ये अॅमी आमि ली हे पहिले समलैंगिक कपल आहे. पण, त्यांच्यानंतर हीली जेन्सन आणि निकोला हँकॉक, दक्षिण आफ्रिकेची कर्णधार डेन व्हॅन निएकर्क आणि मॅरीझाने कॅप्प यांनी विवाह केला.
गतवर्षी अॅमीनं क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. या जोडप्यांनी ऑगस्ट महिन्यात बाळाच्या जन्माचा महिना सोशल मीडियावर जाहीर केला होता.
अॅमी आणि ली यांनी 13 जानेवारीला बाळा जन्म दिला आणि त्यांनी सोशल मीडियावर फोटोही शेअर केला.