Cricket Buzz»फोटो गॅलरी »'या चौघी' रोहित - विराटपेक्षाही लय भारी!'या चौघी' रोहित - विराटपेक्षाही लय भारी! By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 2:06 PMOpen in App1 / 9ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये पहिल्या चार क्रमांकावर महिला खेळाडू आहेत, यावर कदाचित विश्वास बसणार नाही. मात्र, यात तथ्य आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा या क्रमवारीत खूप पिछाडीवर आहेत.2 / 9न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाच्या सूजी बॅट्सने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये स्वतःच्या नावावर विक्रमाची नोंद केली. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये तीन हजार धावांचा पल्ला ओलांडणारी ती पहिली खेळाडू ठरली.3 / 9आयसीसी महिला ट्वेंटी-२० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात सूजीने हा विक्रम केला. तिने 107 डावांमध्ये 30.68च्या सरासरीने 3007 धावा केल्या आहेत. तिच्या नावावर एक शतक आणि 20 अर्धशतकं आहेत.4 / 931 वर्षीय सूजीने शनिवारी झालेल्या सामन्यात 11 धावा केल्या. न्यूझीलंडने हा सामना 8 विकेटने जिंकला. मात्र, त्यांना उपांत्य फेरीत प्रवेश मिळवता आला नाही. ब गटातून ऑस्ट्रेलिया आणि भारत यांनी उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. 5 / 9महिलांच्या ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत वेस्ट इंडिजची स्टेफनी टेलर ( 2732) दुसऱ्या क्रमांकावर आहे. 6 / 9तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंडची चार्लेस एडवर्ड्सचा ( 2605) क्रमांक येतो.7 / 9भारताची मिताली राज 85 सामन्यंत 2283 धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे. 8 / 9पुरुषांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत न्यूझीलंडचा मार्टिन गुप्तील 2271 धावांसह अव्वल स्थानी आहे.9 / 9भारताचा रोहित शर्मा ( 2207) आणि कर्णधार विराट कोहली ( 2102) या क्रमवारीत अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications