Join us  

KL Rahul मुळे भारताच्या फलंदाजीत बदल; विराट कोहली, शुबमन गिल यांचे 'डिमोशन'?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 4:47 PM

Open in App
1 / 6

Asia Cup 2023 - आशिया चषक २०२३ स्पर्धेसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने आशिया चषक महत्त्वाचा आहे. लोकेश राहुल, श्रेयस अय्यर व जसप्रीत बुमराह हे या स्पर्धेतून भारताच्या वन डे संघात पुनरागमन करत आहेत.

2 / 6

३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांत ( पाकिस्तान व नेपाळ) KL Rahul खेळणार नसल्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने सांगितले अन् चाहत्यांचे टेंशन वाढले. आता सलामीपासून चौथ्या क्रमांकापर्यंत भारतीय संघाच्या फलंदाजीत बदल करावा लागणार आहे. KL च्या जागी इशान किशनला ( Ishan Kishan) संधी मिळण्याची दाट शक्यता आहे आणि असे झाल्यास विराट कोहली व शुबमन गिल यांचे डिमोशन झालेले पाहायला मिळू शकते.

3 / 6

''लोकेश राहुलने फलंदाजी चांगली केली, यष्टिंमागेही चांगला खेळ त्याने केला आहे. त्याच्या तंदुरुस्तीत चांगली सुधारणा आहे, परंतु वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर आहे. त्यामुळे त्याला लगेच मॅच खेळण्यास उतरवणे, धोकादायक ठरेल. पण, तो पहिल्या दोन सामन्यांत खेळणार नाही. श्रेयस अय्यर पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि त्याने दमदार फलंदाजी केली,''असे द्रविड म्हणाला. त्यामुळे पाकिस्तान ( २ सप्टेंबर) व नेपाळ ( ४ सप्टेंबर) या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये टीम इंडियाला पुन्हा प्रयोग करावे लागतील.

4 / 6

भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यानेही त्याबाबत ट्विट केले आहे. त्याने लिहिले की, पहिल्या दोन सामन्यांसाठी लोकेश राहुल उपलब्ध नाही. त्यामुळे इशान किशन सलामीला खेळणार का? जर हा, तर शुबमन गिल कुठल्या क्रमांकावर फलंदाजी करेल? किंवा रोहीत-गिल-इशान १-२-३ असे खेळतील आणि कोहली चौथ्या क्रमांकावर? किंवा रोहित-गिल सलामीला, कोहली तिसऱ्या आणि इशान पाचव्या क्रमांकावर? किंवा गिलला विश्रांती आणि तिलक वर्मा व सूर्यकुमार यादव ५व्या क्रमांकावर?चला चर्चा करूया...

5 / 6

अशी असू शकते प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा, इशान किशन, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल/शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी

6 / 6

आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, इशान किशन, शार्दूल ठाकूर, अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा.

टॅग्स :एशिया कप 2023लोकेश राहुलइशान किशन
Open in App