Join us  

Ravi Shastri, India's best XI of all-time: ना रोहित, ना विराट! शास्त्री गुरूजी म्हणतात- 'हा' आहे भारताचा 'ऑल टाइम बेस्ट - 'नंबर 1' खेळाडू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2023 12:41 PM

Open in App
1 / 7

Ravi Shastri, India's best XI of all-time: भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे त्यांच्या स्पष्ट वक्तृत्वासाठी आणि त्यांच्या स्पष्ट मतांसाठी ओळखले जातात. त्यांनी पुन्हा एकदा असे काहीसे केले आहे.

2 / 7

भारताच्या माजी प्रशिक्षकाने यावेळी त्यांच्या सर्वकालीन सर्वोत्तम खेळाडूंच्या प्लेईंग ११ बद्दल मत मांडले. विशेष म्हणजे त्याने आपल्या संघातील खेळाडूंमध्ये ज्याला 'नंबर १' निवडले, ज्यात ना विराट कोहली आहे, ना रोहित शर्माचा समावेश आहे.

3 / 7

या दोघांपैकी कोणालाही अव्वल स्थान न देता, रवी शास्त्रींनी एका वेगळ्याच खेळाडूला त्यांच्या सर्वकालीन सर्वोत्तम खेळणाऱ्या 11 मध्ये अव्वल स्थान दिले आहे. आयसीसीच्या रिव्ह्यूमध्ये शास्त्रींनी हे मोठे विधान केले आहे.

4 / 7

रविचंद्रन आर अश्विन आणि रविंद्र जाडेजा ही अलीकडच्या काळात जागतिक क्रिकेटमधील सर्वात धोकादायक फिरकी जोडी म्हणून उदयास आली आहे. या दोघांनी मिळून ४५ कसोटीत २१ च्या सरासरीने ४६२ विकेट घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सध्याच्या मालिकेतही पहिल्या दोन कसोटीत दोघांनी मिळून ४० पैकी ३१ विकेट घेतल्या आहेत.

5 / 7

रवी शास्त्री म्हणाले, 'मी विविध युगतील खेळाडूंना तुलना करणे योग्य समजत नाही. परंतु सध्या मला असे वाटते की जे लोक खेळत आहेत, त्यात अश्विनचा विक्रम, विशेषत: भारतीय परिस्थितीतील कामगिरी पाहता, त्याला सर्वकालीन XI मध्ये समावेश करण्यात पहिला नंबर द्यावा लागेल.'

6 / 7

'भारतीय परिस्थितीत अश्विनची कामगिरी भलतीच वेगळी असते. तो अप्रतिम कामगिरी करून दाखवतो. तुम्ही यापूर्वीही अनेक महान फिरकीपटू पाहिले आहेत. पण मला असे वाटते की अश्विन हा आताच्या घडीच्या सर्वच खेळाडूंमध्ये सर्वांत वरच्या क्रमांकावर आहे. गोलंदाजीसह तो महत्त्वाच्या टप्प्यांवर धावाही करतो आणि संघासाठी उपयुक्त ठरतो.'

7 / 7

'त्याला हल्ली लौकिकाला साजेशी कामगिरी करता येऊ लागली असून त्याचे श्रेय मिळू लागले आहे. गेल्या दीड वर्षापासून तो चांगली कामगिरी करतो आहे. जाडेजाने गुडघ्याच्या दुखापतीतून पुनरागमन केल्यापासून तो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याचबरोबर त्याची फलंदाजीही उत्कृष्ट आहे. तो लवकरच या यादीत अश्विनला टक्कर देईल.'

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारवी शास्त्रीआर अश्विनरवींद्र जडेजाविराट कोहलीरोहित शर्मा
Open in App