Cricket Buzz»फोटो गॅलरी »ICC Player of the Month: मैदानावरील झुंजीनंतर आता ICC पुरस्कारांसाठीही भारत विरूद्ध पाकिस्तान!ICC Player of the Month: मैदानावरील झुंजीनंतर आता ICC पुरस्कारांसाठीही भारत विरूद्ध पाकिस्तान! By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2022 1:11 PMOpen in App1 / 8भारत विरूद्ध पाकिस्तान सामना म्हटलं की क्रिकेट वर्तुळात अनेक चर्चा रंगत असतात. हा बहुचर्चित सामना पाहण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने जमत असतात. असाच भारत विरूद्ध पाकिस्तानचा सामना आयसीसीच्या पुरस्कारात देखील पाहायला मिळत आहे. खरं तर आयसीसीने जाहीर केलेल्या ऑक्टोबर 2022साठीच्या सर्वोत्तम खेळाडूंच्या पुरस्काराच्या यादीत भारतीय खेळाडूंनी बाजी मारली आहे. 2 / 8आयसीसीने जाहीर केलेल्या ऑक्टोबर 2022च्या सर्वोत्तम महिला खेळाडूंच्या यादीत आशियाई खेळाडूंनी बाजी मारली. यामध्ये एक पाकिस्तानी तर दोन भारतीय महिला क्रिकेटपटूंचा समावेश आहे. तर पुरूषांच्या यादीत भारताचा विराट कोहली, दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर आणि झिम्बाब्वेच्या सिकंदर रझाला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. 3 / 8विराट कोहलीने मागील महिन्यात फक्त चार डाव खेळले मात्र किंग कोहलीने टी-20 विश्वचषकात पाकिस्तानविरूद्ध 82 धावांची नाबाद खेळी केली होती. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात भारताचे अवघ्या 31 धावांवर 4 गडी बाद झाले होते. शेजाऱ्यांनी दिलेल्या 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ दबावात होता. अशा स्थितीत किंग कोहलीने शानदार खेळी करून संघाला विजय मिळवून दिला.4 / 8दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. विश्वचषकापूर्वी भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात मिलरने 47 चेंडूत 106 धावांची शतकी खेळी केली होती. याशिवाय लखनौ येथील एकदिवसीय सामन्यात त्याने 75 धावांची नाबाद खेळी केली होती. एकूणच मिलरने मागील महिन्यात एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांमध्ये सात डाव खेळले त्यातील सहा डावांमध्ये तो नाबाद राहिला होता. 5 / 8झिम्बाब्वेचा अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझाने आपल्या शानदार खेळीने सर्वांना प्रभावित केले आहे. आयर्लंडविरुद्धच्या टी-20 विश्वचषकातील सलामीच्या सामन्यात त्याने चमकदार सुरूवात केली होती. रझाने अवघ्या 47 चेंडूत 82 धावा केल्या आणि झिम्बाब्वेने स्पर्धेत विजयी सलामी दिली. रझाने स्कॉटलंडविरुद्ध आणखी एक अष्टपैलू खेळी केली. स्कॉटलंडविरूद्ध त्याने 23 चेंडूंत 40 धावा केल्या आणि त्यानंतर 20 धावा देऊन 1 बळी पटकावला. 6 / 8ऑक्टोबर 2022च्या महिन्यात भारतीय महिला खेळाडूंनी आपल्या खेळीने सर्वांना प्रभावित केले होते. यामध्ये खासकरून अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माने सर्वांचे लक्ष वेधले. मागील महिन्यात झालेल्या महिला आशिया चषक स्पर्धेत तिने उत्कृष्ट कामगिरी केली होती, याचीच दखल घेत आयसीसीने दीप्ती शर्माला ऑक्टोबर महिन्यातील सर्वोत्तम महिला खेळाडूचा पुरस्कार जाहीर केला. दीप्तीने ऑक्टोबर महिन्यात एकूण आठ सामने खेळले आणि 7.69 च्या नेत्रदीपक सरासरीने 13 बळी पटकावले. ज्यामध्ये थायलंड आणि पाकिस्तान विरुद्ध अनुक्रमे 3/7 आणि 3/27 च्या उत्कृष्ट स्पेलचा समावेश आहे. याशिवाय तिने यूएईविरूद्ध 64 धावांची शानदार खेळी देखील केली होती. 7 / 8आयसीसीच्या सर्वोत्तम महिला खेळाडूंमध्ये आशियाई खेळाडूंनी बाजी मारली. या यादीत आणखी एका भारतीय महिला खेळाडूचा समावेश आहे. 22 वर्षीय जेमिमा रॉड्रिग्ज आशिया चषकात भारताकडून सर्वोत्तम फलंदाज ठरली. रॉड्रिग्सने या स्पर्धेत 54.25 च्या उत्कृष्ट सरासरीने 217 धावा केल्या. तिने अनुक्रमे 78 आणि 75* च्या दोन उत्कृष्ट खेळी श्रीलंका आणि यूएईविरुद्ध केल्या.8 / 8 या यादीत पाकिस्तानच्या निदा दार हिचा देखील समावेश आहे. तिने आशिया चषकाच्या स्पर्धेतील सहा सामन्यांमध्ये 145 धावा केल्या होत्या. यामध्ये भारताविरुद्धच्या तिच्या अष्टपैलू खेळीचाही समावेश आहे. भारताला या स्पर्धेत केवळ एक सामना गमवावा लागला होता. भारताविरूद्धच्या सामन्यात निदा दारने 56 धावांची नाबाद खेळी करून पाकिस्तानला विजय मिळवून दिला होता. यासह तिने 23 धावा देऊन 2 बळी पटकावले होते. खरं तर आयसीसीच्या सर्वोत्तम महिला खेळाडूंच्या यादीत केवळ भारत आणि पाकिस्तानी संघातील खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे आयसीसीच्या पुरस्कारात देखील भारत विरूद्ध पाकिस्तान असा सामना रंगला, ज्यामध्ये भारताने बाजी मारली. आणखी वाचा Subscribe to Notifications