Join us  

Ajinkya Rahane: केवळ IPLमधील कामगिरीच नाही, तर अजिंक्य रहाणेच्या पुनरागमनात हे कारणही ठरलं महत्त्वाचं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 2:23 PM

Open in App
1 / 8

तंत्रशुद्ध आणि शैलीदार फलंदाज अजिंक्य रहाणेने अखेर भारतीय क्रिकेट संघात पुनरागन केलं आहे. त्याला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी निवडलेल्या १५ सदस्यीय संघात स्थान देण्यात आलं आहे.

2 / 8

३४ वर्षीय अजिंक्य रहाणेने त्याचा शेवटचा कसोटी सामना जानेवारी २०२२ मध्ये खेळला होता. मात्र आयपीएलमध्ये जबरदस्त फलंदाजी करत त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामुळे आता केवळ आयपीएलमधील ५ डावांतील खेळीमुळेच रहाणेला संघात स्थान मिळालं का, असा प्रश्न विचारला जात आहे.

3 / 8

मात्र तसं नाही आहे. आयपीएलच्या आधी अजिंक्य रहाणे रणजी करंडक स्पर्धेतही खेळला होता. त्यावेळी त्याने मुंबईच नेतृत्व करताना ७ सामन्यांमधील ११ डावांमध्ये ५८ च्या सरासरीने ६३४ धावा काढल्या होत्या. त्यात २ शतकं आणि एका अर्धशतकाचा समावेश होता.

4 / 8

याचदरम्यान, मुंबईच्या सरफराज खाननेही तुफानी फलंदाजी केली होती. मात्र त्याच्याऐवजी निवड करताना अजिंक्य रहाणेच्या पारड्यात निवड समितीनं झुकतं माप दिलं. मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त आहे. जर तो फिट असता तर कदाचित रहाणेला संघाल स्थान मिळालं नसतं.

5 / 8

दुसरी बाब म्हणजे अजिंक्य रहाणेकडे अनुभव आहे. तो याआधी इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेट खेळलेला आहे. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धची त्याची कामगिरीही प्रभावी झालेली आहे. त्यामुळे निवड समितीने त्याच्या अनुभवाला प्राधान्य दिलं आहे.

6 / 8

अजिंक्य रहाणेने ८२ कसोटी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. तसेच त्याने तब्बल ५ हजार धावाही काढल्या आहेत. कसोटीमध्ये १२ शतके आणि २५ अर्धशतके त्याच्या नावावर आहेत.

7 / 8

इंग्लंडमध्ये खेळलेल्या १५ कसोटी सामन्यांमध्ये अजिंक्य रहाणेने २९ डावात २६ च्या सरासरीने ७२९ धावा काढल्या आहेत. त्यात १ शतक आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे.

8 / 8

तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धही त्याची कामगिरी लक्षवेधी झालेली आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या १७ कसोटी सामन्यातील ३२ डावांमध्ये ३८ च्या सरासरीने १०९० धावा काढल्या आहेत. त्यामध्ये २ शकते आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे. दरम्यान, यंदाच्या आयपीएलमध्ये रहाणेने २०० च्या स्ट्राईक रेटने २०० धावा कुटल्या आहेत.

टॅग्स :अजिंक्य रहाणेभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा
Open in App