वरुण चक्रवर्ती नाही, तर हा खेळाडू होता 'मॅन ऑफ द मॅच'चा खरा दावेदार; झाकोळला गेला की अन्याय झाला?

India vs New Zealand, Champions Trophy 2025: मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीने १० ओव्हरमध्ये ४२ रन्स देऊन ५ विकेट घेतले होते. वरुणला त्याच्या या चांगल्या गोलंदाजीबद्दल मॅन ऑफ द मॅच निवडले गेले. परंतू, वरुणपेक्षा आणखी एक खेळाडू मॅन ऑफ द मॅचसाठी खरा दावेदार होता असे सोशल मीडियावर बोलले जात आहे.

चॅम्पिअन्स ट्रॉफीच्या रविवारी झालेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला ४४ धावांनी हरविले आहे. मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीने १० ओव्हरमध्ये ४२ रन्स देऊन ५ विकेट घेतले होते. वरुणला त्याच्या या चांगल्या गोलंदाजीबद्दल मॅन ऑफ द मॅच निवडले गेले. परंतू, वरुणपेक्षा आणखी एक खेळाडू मॅन ऑफ द मॅचसाठी खरा दावेदार होता असे सोशल मीडियावर बोलले जात आहे.

टीम इंडियाने बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सर्व ३ सामन्यांमध्ये विजय मिळवून ग्रुप अमध्ये पहिले स्थान पटकावले आहे. आता भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. हा सामना ४ मार्चला होणार असून १० वर्षांनी हा योग जुळून आला आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीमुळे संकटाच्या काळात भारताचा डाव सावरलेल्या श्रेयस अय्यरच्या खेळीकडे दुर्लक्ष झाल्याची भावना क्रिकेट चाहत्यांमध्ये आहे. खरेतर गिल, रोहित आणि विराट यांच्या विकेट स्वस्तात गेलल्या असताना बिकट परिस्थितीत अय्यरने भारताचा डाव सावरला होता. त्याच्या खेळीमुळेच भारताला २४९ चा आकडा गाठता आला होता. त्याला सामनावीर घोषित करायला हवे होते, त्याच्यावर अन्याय झाल्याचे चाहते सांगत आहेत.

जेव्हा भारताची धावसंख्या ही २२ वर दोन विकेट अशी होती तेव्हा अय्यर खेळायला आला होता. यानंतर कोहली आऊट झाला आणि अय्यरने एका बाजुने लढाई सुरु ठेवली. त्याला अक्षर पटेलची चांगली साथ मिळाली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 98 धावांची भागीदारी केली आणि भारताला सामन्यात परत आणले. पटेलने ६० चेंडूंत ४२ आणि अय्यरने ९८ चेंडूंत ७९ रन्स काढले होते.

अत्यंत बिकट परिस्थितीत दोघांनी हरलेला डाव सांभाळला आणि भारताला पुन्हा लढण्याच्या क्षमतेत आणले. अय्यर खेळला नसता तर भारत २०० च्या आतच गारद झाला असता. यानंतर वरुण चक्रवर्तीने पाच विकेट घेऊनही भारताच्या विजयाची काहीच खात्री नव्हती.

वरुणच्या घातक गोलंदाजीमुळे भारताला विजय मिळाला आहे, परंतू त्यामुळे अय्यरची खेळी झाकोळली गेली असल्याचे क्रिकेट प्रेमींचे म्हणणे आहे. काहीही झाले तरी अनेकांनी भारतीय संघ जिंकला हे महत्वाचे असल्याचे देखील मत मांडले आहे.